Kitchen Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: 'हे' पदार्थ फ्रीजमध्ये ठेऊन खाल्ल्यास आरोग्यावर बेतण्याची शक्यता

Health Tips: लसूण हा नेहमी सामान्य तापमानात साठवला पाहिजे.

दैनिक गोमन्तक

Health Tips: अन्नपदार्थ बराच काळ चांगले राहण्यासाठी, भाज्या आणि इतर पदार्थ चांगल्या स्थितित ठेवण्यासाठी आपण फ्रिजचा सर्सास वापर करतो. मात्र अशा काही भाज्या आहेत, ज्या फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर ते खाण्यायोग्य राहत नाहीत. चला जाणून घेऊयात असे काही पदार्थ जे फ्रिजमध्ये ठेऊन खाणे किंवा इतर अन्नपदार्थात वापरणे अयोग्य असते.

१. लसूण

सोललेला लसूण कधीही विकत घेऊ नका किंवा फ्रिजमध्ये ठेवू नका. लसणावर बुरशी फार लवकर वाढते. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. नेहमी न सोललेला लसूण खरेदी करा आणि गरज असेल तेव्हाच सोलून घ्या. लसूण हा नेहमी सामान्य तापमानात साठवला पाहिजे.

२. आलं

आलं बरेच दिवस टिकत असल्याचा आपल्याला अनुभव असतो. त्यामुळे आपण भरपूर प्रमाणात बाजारातून खरेदी करतो. अनेकदा हे आले आपण फ्रीजमध्ये ठेवतो. मात्र ओलसरपणामुळे आल्यावरदेखील लवकर बुरशी वाढते. त्यानंतर याचा वापर आपण केला तर हा एक विषारी पदार्थ बनतो. यामुळे मूत्रपिंड आणि यकृत निकामी होण्याचा धोका मानला जातो. आलं हे सामान्य तापमानात ठेवले पाहिजे तसे स्वच्छ ठेवले पाहिजे.

३. भात

अनेकजण जास्त झालेला भात फ्रिजमध्ये ठेवणे पसंत करतात. मात्र शिळा भात खाणे आरोग्यासाठी महत्वाचे मानले जाते. त्यामुळे भातदेखील फ्रिजमध्ये न ठेवण्याचा तज्ञ सल्ला देतात.

४. कांदे

आपण अर्धा चिरलेला कांदा फ्रिजमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवतो. मात्र कांदे कमी तापमानात जास्त वेळ टिकू शकत नाहीत. त्यामुळे जेव्हा कांदे फ्रिजमध्ये ठेवलेले असतात त्यावेळी आरोग्यास हानीकारक जीवाणू तयार होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sawantwadi: सावंतवाडीत 2 गटांत राडा! मारहाण, अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न; पुणे, सिंधूदुर्गातील 9 जणांना अटक

Goa politics: खरी कुजबुज; विजय-मनोज युतीने लढणार?

Karun Nair Century: 6,6,6,4,4! 'अभी हम जिंदा है', करुण नायरचे गोव्याविरुद्ध दमदार शतक; निवड समितीचे वेधले लक्ष

Kidnapping Case: 'अभ्यासातून सुटका पाहिजे होती'! 13 वर्षीय मुलाने केला अपहरणाचा बनाव; गोव्यातील 3 खोटी प्रकरणे उघड

Ravi Naik: 'रवी नाईक' यांचे कार्य त्यांच्या मुलांनी पुढे न्यावे! फोंड्यातील शोकसभेला तुडुंब गर्दी; गोमंत विभूषण पुरस्कार देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT