Health Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Health Tips : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी करा घरच्या घरी 'हे' उपाय

घरी राहून तुम्ही कसे तंदुरुस्त दिसू शकता. तुमचा फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही सायकलिंग करू शकता.

गोमन्तक डिजिटल टीम

हिवाळ्याच्या दिवसात सर्वात कठीण काम म्हणजे लवकर उठणे आणि व्यायाम करणे. अनेकदा थंडीच्या दिवसात प्रत्येकाला घरी राहावंसं वाटतं. सकाळ असो वा संध्याकाळ प्रत्येकाला जिममध्ये जाण्याचा आळस येऊ लागतो. अशा परिस्थितीत जिममध्ये न गेल्याने आपण आपल्याच शरीराचे नुकसान करून घेत आहोत.  जर तुम्ही रोज व्यायाम केला नाही तर तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्या जाणवू लागतील.

याशिवाय अनेक आजार उद्भवू शकतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही घरात राहून कसा तुमचा फिटनेस मेंटेन करू शकता. यासाठी तुम्हाला घरीच काही नियम बनवावे लागतील. चला तर मग जाणून घेऊया घरी राहून तुम्ही कसे तंदुरुस्त दिसू शकता. तुमचा फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही सायकलिंग करू शकता. जर तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करायला कंटाळा येत असेल तर सायकलिंग हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

सकाळी काही सामान घेण्यासाठी घराबाहेर पडलात तर सायकलचा वापर करावा. सायकलिंगच्या मदतीने आपल्या शरीरात ऊर्जा तर येतेच पण तंदुरुस्त राहण्यासही खूप मदत होते. जर तुम्ही दिवसातून दोनदा सायकलिंग करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. याशिवाय तुम्ही घरच्या घरी स्ट्रेचिंग किंवा व्यायाम करू शकता. घरच्या घरी सहज व्यायाम केल्याने तुमचे शरीर सक्रिय राहते तसेच रक्ताभिसरणही चांगले होते. 

घरात राहूनही तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. तुम्हाला फक्त कोणत्याही कामात व्यस्त राहावं लागेल. जसं की घर स्वतः स्वच्छ करणे. अशा प्रकारे तुम्हाला दिवसभर सक्रिय वाटेल. चालण्याने शरीर निरोगी राहते. तसेच, हिवाळ्यात जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात निर्जलीकरण होऊ शकते आणि तुम्ही आजारी पडू शकता. दिवसभर स्वत:ला व्यस्त ठेवा, शरीर जेवढे चालत राहते, तेवढेच तुम्ही तंदुरुस्त राहता.

(आयुर्वेदिक चिकित्सा ही व्यक्तिपरत्वे होणारी असते. वरील माहितीमधील कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem Lake: पुन्हा उघडतोय मयेचा तलाव, आमदार प्रेमेंद्र शेट यांनी स्वतः केली पाहणी; नेमकी तारीख काय? वाचा 

Sawantwadi Beef Smuggling: आत याल तर जीव देऊ! कात्री दाखवत महिलेची पोलिसांना धमकी; सावंतवाडीत 80 किलो गोमांस जप्त

"50 हजार तालांव, 48 तास कोलवाळ जेल", दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या पर्यटकांवर लोबोंनी काढलाय 'जालीम' उपाय!

टीम इंडियाचा ऐतिहासिक रेकॉर्ड! वेस्ट इंडीजला सलग 10व्या कसोटी मालिकेत चारली पराभवाची धूळ; दक्षिण आफ्रिकेच्या विक्रमाशी केली बरोबरी VIDEO

India Pakistan Conflict: "पाकिस्तान पहलगामसारखा आणखी एक हल्ला करू शकतो", लेफ्टनंट जनरल मनोज कटियार यांचा इशारा; भारत प्रत्युत्तर देण्यास सज्ज

SCROLL FOR NEXT