Lung Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lung Cancer: शरीर देते फुफ्फुसाच्या कर्करोगाचे संकेत, 'या' लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करु नका; वेळीच घ्या उपचार

Lung Cancer Symptoms: कर्करोगाच्या अनेक प्रकरापैकी एक असणाऱ्या फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे बहुतेक रुग्णांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. काही लोकांमध्ये त्याची लक्षणे दिसतात, परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करतात.

Manish Jadhav

देशात गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. कर्करोगाच्या अनेक प्रकरापैकी एक असणाऱ्या फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे बहुतेक रुग्णांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. काही लोकांमध्ये त्याची लक्षणे दिसतात, परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करतात. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे धूम्रपान. याशिवाय, वायू प्रदूषण आणि व्हेपिंग देखील या रोगाचे एक प्रमुख कारण आहे. जेव्हा फुफ्फुसामध्ये कर्करोग होतो तेव्हा फुफ्फुसाच्या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात. तथापि, प्रगत उपचार तंत्रांमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी झाले आहे.

फुफ्फुसाचा कर्करोग

दरम्यान, जर कुटुंबातील एखाद्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाला असेल तर तो तुमच्यासाठीही धोकादायक ठरु शकतो. याशिवाय, याची इतरही अनेक कारणे आहेत. सिगारेट, सिगार, पाईप किंवा इतर कोणत्याही स्वरुपात तंबाखूचे सेवन केल्याने धोका वाढतो. तज्ञांच्या मते, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या 80 टक्के प्रकरणांचे कारण धूम्रपान आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाची (Cancer) सुरुवातीची लक्षणे खूपच सौम्य असतात आणि ती काही मोजक्या रुग्णांमध्येच दिसून येतात. कधीकधी औषध घेतल्यानंतर सुरुवातीची लक्षणे थांबतात, ज्यामुळे रुग्णांची तपासणी होत नाही आणि कर्करोगाचा टप्पा वाढत राहतो.

ही आहेत फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे

मॅक्स हॉस्पिटलमधील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रोहित कपूर सांगतात, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या बाबतीत सतत खोकला हे मुख्य प्रारंभिक लक्षण आहे. याशिवाय, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे आणि वजन कमी होणे ही देखील त्याची लक्षणे आहेत. गंभीर लक्षणांमध्ये खोकल्यातून रक्त येणे, वारंवार श्वास घेण्यास त्रास होणे आणि अचानक, जलद वजन कमी होणे आहे. जर कोणाला ही लक्षणे आढळली तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा (Doctors) सल्ला घ्यावा. जसजसा टप्पा वाढतो तसतसा धोकाही वाढतो.

उपचार काय आहेत?

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवली तर ताबडतोब तपासणी करुन घ्या. तपासणीमध्ये प्रथम एक्स-रे करता येतो. एक्स-रे फुफ्फुसातील बदल शोधतो. फुफ्फुसामध्ये निर्माण होणारे ट्यूमर आणि अनियमितता एक्स-रे द्वारे पाहता येतात. जर एक्स-रेमध्ये स्पष्टता नसेल तर सीटी स्कॅन देखील करता येते. याशिवाय, रक्त तपासणीद्वारे देखील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान करता येते. जर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधलात तर ते तुमची ब्रॉन्कोस्कोपी देखील करु शकतात. यामध्ये, फुफ्फुसामध्ये एक ट्यूबद्वारे तपासणी केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT