Cancer: फक्त शरीर नव्हे, मेंदूलाही घेरतो कर्करोग; रुग्णाची जगण्याची इच्छा होऊ लागते कमी, संशोधनातून खुलासा

Impact Of Cancer On The Brain: देशात गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कर्करोगाचा केवळ शरीराच्या प्रभावित भागावरच परिणाम होत नाही तर मेंदूही त्याचा परिणाम होतो.
Impact Of Cancer On The Brain
CancerDainik Gomantak
Published on
Updated on

देशात गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कर्करोगाची लागण झाल्याचे समजताच बहुतेक लोक त्याच्याशी लढण्याचे धाडस गमावतात. तथापि, या आजारावर चौथ्या टप्प्यातही उपचार शक्य आहेत. मात्र लोक सुरुवातीच्या टप्प्यातच या आजारासमोर शरणागती पत्करतात. दरम्यान, एका संशोधनात असे दिसून आले की कर्करोगाचा केवळ शरीराच्या प्रभावित भागावरच परिणाम होत नसून मेंदूवरही होत आहे.

सायन्स मासिकात प्रकाशित झालेल्या एका संशोधनात कर्करोगाचा (Cancer) मेंदू आणि मज्जासंस्थेवर कसा परिणाम होतो हे सांगितले आहे. यासाठी उंदरांवर संशोधन करण्यात आले. या संशोधनातून आश्चर्यकारक निकाल समोर आले. कर्करोगाचा टप्पा जसजसा वाढत जातो तसतसा हा आजार रुग्णाच्या मनाशी खेळू लागतो. हा आजार रुग्णाच्या मनातून जगण्याची इच्छाशक्ती आणि प्रेरणा नष्ट करतो, ज्यामुळे उपचार आणि पोषण असूनही रुग्ण कमकुवत होतो. त्यामुळे रुग्णाची प्रकृती बिघडते.

Impact Of Cancer On The Brain
Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरची ओळख कोणत्या टेस्टने होते? किंमत किती आणि केव्हा करावी?

संशोधनातून काय समोर आले?

उंदरांवर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले की, कर्करोग मेंदूच्या एका विशिष्ट भागावर कब्जा करतो आणि मज्जासंस्थेवर वाईट परिणाम करतो. या संशोधनासाठी काही प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. हे तंत्रज्ञान मेंदूचे अचूक निरीक्षण करु शकते. संशोधनात पुढे असेही आढळून आले की, कर्करोग जसजसा वाढत गेला तसतसे उंदरांनी अन्न मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न कमी केले. कठीण कामे पूर्णपणे थांबली. या संशोधनात पुढे असे दिसून आले की, मज्जासंस्थेद्वारे मेंदूमध्ये तयार होणाऱ्या डोपामाइन या केमिकलची पातळी देखील कमी झाली. हे केमिकल प्रेरणेचा स्रोत असते, जे व्यक्तीमध्ये इच्छाशक्ती जागृत करते.

Impact Of Cancer On The Brain
Breast Cancer: महिलांनो स्तनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको; कर्करोगाची 'ही' लक्षणं तुमच्यात तर नाहीत ना?

संशोधनातून असे दिसून आले की, कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यातील उपचारादरम्यान रुग्ण जगण्याची आशा गमावतो. एवढचं नाहीतर रुग्ण (Patient) सर्वांपासून अलिप्त राहून मृत्यू स्वीकारतो. सुरुवातीला हा दीर्घ आजारामुळे होणारा मानसिक आजार मानला जात होता. परंतु, संशोधनानंतर हे स्पष्ट झाले की, कर्करोग केवळ शरीरावरच नाही तर मेंदूवरही कब्जा करतो आणि रुग्णाची जगण्याची इच्छा समाप्त करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com