Diabetes Control Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Diabetes Day: 'सायलेंट किलर' म्हणून ओळखला जाणारा डायबेटीस! एक गंभीर आरोग्य समस्या आणि उपाययोजना

Diabetes information: मधुमेह, ज्याला वैद्यकीय भाषेत ''डायबिटीज मेलिटस'' (Diabetes Mellitus) असे म्हणतात, हा जगभरात आणि विशेषतः भारतात झपाट्याने वाढणारा एक गंभीर आणि दीर्घकालीन (chronic) आजार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मधुमेह, ज्याला वैद्यकीय भाषेत ''डायबिटीज मेलिटस'' (Diabetes Mellitus) असे म्हणतात, हा जगभरात आणि विशेषतः भारतात झपाट्याने वाढणारा एक गंभीर आणि दीर्घकालीन (chronic) आजार आहे. हा आजार शरीरातील अन्तःस्रावांच्या विस्कळीतपणामुळे होतो, ज्यात रक्तातील साखरेची (ग्लूकोज) पातळी अनियंत्रितपणे वाढते. वेळेवर निदान आणि योग्य काळजी न घेतल्यास मधुमेह अनेक गंभीर गुंतागुंती निर्माण करू शकतो, ज्यामुळे डोळ्यांचे विकार, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयरोग आणि मज्जातंतूंचे नुकसान अशा समस्या उद्भवू शकतात.

निवारण आणि व्यवस्थापन

मधुमेह पूर्णपणे बरा करता येत नसला तरी, योग्य व्यवस्थापनाने तो नियंत्रणात ठेवता येतो. यामध्ये खालील उपायांचा समावेश आहे:

सकस आहार: प्रक्रिया केलेले साखरयुक्त पदार्थ टाळून, फळे, भाज्या, कडधान्ये आणि संपूर्ण धान्याचा (whole grains) आहारात समावेश करावा.

नियमित व्यायाम: दररोज किमान ३०-४५ मिनिटे व्यायाम, चालणे किंवा योगासने करणे महत्त्वाचे आहे.

वजन नियंत्रण: शरीराचे आदर्श वजन (BMI) राखणे गरजेचे आहे.

औषधोपचार: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधे किंवा इन्शुलिन घेणे आवश्यक आहे.

मधुमेहाबद्दल जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून, या आजाराच्या गंभीर परिणामांपासून आपण आपले आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो. जीवनशैलीत सकारात्मक बदल करून या आजारावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवता येते.

मधुमेह (डायबेटिस) हा शब्द आता बहुतेक सर्वांच्या ओळखीचा झालेला आहे. डायबेटिस, रक्तातील साखर तपासणे, इन्शुलिन या शब्दांचीही आपल्या सर्वांना सवय झाली आहे.

पण आपल्यालाही कधीतरी डायबेटिस होईल अशी भीती अनेक जणांना वाटत असेल. त्यामुळे डायबेटिस होण्याआधीच त्याला रोखण्यासाठी काय प्रयत्न करायचे याची माहिती आपण घेणार आहोत.

रक्तामधील साखरेची पातळी एका मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यामुळे मधुमेह ही आयुष्यभर चालणारी स्थिती तयार होते.

डायबेटिससारखी शंका आल्यास कोणत्याही व्यक्तीने स्वतःच इंटरनेटवर माहिती मिळवून त्याचं निदान करू नये. डायबेटिससाठी आवश्यक त्या चाचण्या, जीवनशैलीतले बदल, आहारातले बदल, औषधे यांचा निर्णय डॉक्टरांनीच घेतला पाहिजे.

कोणत्याही तपासणी, डॉक्टरांविना स्वतःहून ऐकीव माहितीवर निर्णय घेणं धोकादायक ठरू शकतं याची जाणीव ठेवली पाहिजे.

डायबेटिसचे दोन मुख्य प्रकार आहेत.

टाइप वन डायबेटिस- या प्रकारात इन्शुलिन निर्मिती करणाऱ्या पेशींवर शरीरातील प्रतिकारक्षमता हल्ला करते.

टाइप टू डायबेटिस- यामध्ये शरीर पुरेसं इन्शुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीरातील पेशी इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. या प्रकाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असतात.

गरोदरपणामध्ये काही महिलांच्या रक्तात ग्लुकोजची पातळी वाढल्यामुळे त्यांचे शरीर ते सामावून घेण्यासाठी पुरेसं इन्शुलिन तयार करू शकत नाही. त्याला जेस्टेशनल डायबेटिस (Gestational Diabetes) म्हटलं जातं.

डॉक्टरांकडे कधी जायचं?

इंग्लंडच्या एनएचएस संस्थेने काही लक्षणं सांगितली आहेत. त्यापैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास आपण डॉक्टरकडे जाण्याचा विचार केला पाहिजे. एनएचएसने सांगितलेली लक्षणं पुढीलप्रमाणे-

भरपूर तहान लागणे

नेहमीपेक्षा भरपूरवेळा लघवीला जावं लागणं, विशेषतः रात्री

खूप दमल्यासारखं वाटणं

वजन घटणं आणि स्नायूंचं प्रमाण कमी होणं

शिश्न आणि योनीजवळ खाज सुटणं

जखमा फार संथपणे भरणं

दृष्टी कमकुवत होणं

डायबेटिस होऊ नये म्हणून

काय करावं लागेल?

डायबेटिस होऊ नये असा विचार आपण करत असू तर सर्वांत आधी स्वतःचं निरीक्षण करावं लागेल. आपलं वजन, रक्तातील साखरेची पातळी, जीवनशैली यांचा विचार करावा लागेल.

1. कौटुंबिक इतिहास

ज्या लोकांच्या घरामध्ये डायबेटिसने मागच्या पिढ्यांमध्येच प्रवेश केला केला आहे अशा लोकांना डायबेटिसचा धोका जास्त असतो. त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

मुंबईमध्ये हिंदुजा हेल्थकेअरमध्ये कार्यरत असणारे डॉ. शशांक शहा यांच्या मते "आई-वडिलांपैकी कोणालाही डायबेटिस असेल तर घरामध्ये साखर, बाहेरचे खाणे, गोड पदार्थ यांच्यात आधीपासूनच 50 टक्के कपात करता येईल. अशामुळे डायबेटिसचं येणं लांबवता येईल."

मधुहेमहतज्ज्ञ डॉ. किरण शहा यांच्यामते, "डायबेटिसचा इतिहास असणाऱ्या कुटुंबांनी मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष दिलं पाहिजे. अशा मुलांनी आधीपासूनच वजन कमी ठेवणं, व्यायाम करणं गरजेचं आहे."

मोबाईल, संगणकापेक्षा मुलांनी मैदानी खेळ, व्यायाम यावर भर दिला पाहिजे असं डॉ. किरण शहा सांगतात.

2. वजन

आपला बीएमआय म्हणजे उंचीनुसार आदर्श वजन किती आहे हे सर्वांनी पाहिलं पाहिजे. जर वजन लठ्ठपणाकडे जात असेल तर काळजी घ्यावी लागेल. कंबरेचा घेर 90 से. मी. पेक्षा जास्त असता कामा नये असं डॉ. शशांक शहा सांगतात.

ज्या घरांमध्ये लठ्ठपणा, डायबेटिस आधीपासून आहे त्यांनी कमी कॅलरी आणि जास्त प्रथिनं असलेला आहार घेण्यावर भर द्यावा असं डॉक्टर सांगतात.

वजन आटोक्यात ठेवण्याबद्दल डॉ. किरण शहा बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "या लोकांनी स्वतःचं अतिरिक्त असलेलं 7 टक्के वजन कमी केलं त्यांच्यामध्ये डायबेटिस वाढत जाण्याची प्रक्रिया 60 टक्क्यांनी मंदावली तसेच जे लोक प्री-डायबेटिस स्थितीत आहेत त्यांनी आपलं 7 ते 10 टक्के वजन कमी केल्यावर त्यांचा डायबेटिसकडे जाण्याचा वेग मंदावल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे."

3. आहार

भारतीय जेवणात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे. त्या आहारात प्रथिनांनाही जागा दिली पाहिजे. भाज्या- फळं अशा कच्च्या आहाराचं प्रमाण वाढवलं पाहिजे. साखर आणि गोड पदार्थ, चॉकलेट्सचं प्रमाण कमी केलं पाहिजे.

गोड पेयं, थंड पेयं, फळांचे रस, कॉन्सन्ट्रेटेड पेयांमुळे भरपूर साखर पोटात जाते. ते थांबवलं पाहिजे. योग्य प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे आणि वेळेवर पित राहिलं पाहिजे.

डॉ. किरण शहा यांच्यामते, "सर्वांनी आपल्या आहारात तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्सचा वापर वाढवला पाहिजे. प्रक्रिया केलेलं, पॅक फूड कमीत कमी वापरलं पाहिजे. सॅच्यूरेटेड तेल वापरू नये."

4. व्यायाम

प्रत्येक व्यक्तीने घरातील कामांच्या हालचालींशिवाय व्यायाम करण्याची गरज आहे असं डॉक्टर सांगतात.

केवळ घरातल्या कामांवर विसंबून राहाता येणार नाही. चालणे, फिरणे, पोहणे, सायकलिंग, वेट ट्रेनिंगसारखे व्यायाम करण्याची गरज आहे. त्याला पर्याय नाही.

महिलांनी व्यायामाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे हे सांगताना डॉ. किरण शहा म्हणाले, "ज्या महिलांना गरोदरपणाच्या काळामध्ये जेस्टेशनल डायबेटिस होतो त्यांनी प्रसूतीनंतर वजन कमी न केल्यास डायबेटिस कायम राहू शकतो किंवा पुढच्या प्रसूतीच्यावेळेस डायबेटिस निर्माण होऊ शकतो."

यामुळेच महिलांनी वजन आटोक्यात आणून घरगुती कामांसह व्यायामासारख्या हालचाली केल्याच पाहिजेत असं ते म्हणतात.

5. तपासण्या

"साधारण वयाच्या पंचविशीपासून रक्तातील साखर, इन्शुलिन, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसिरॉइडचे प्रमाण तपासण्यासाठी चाचण्या केल्या पाहिजेत. त्यातून डायबेटिसचा अंदाज येऊ शकतो. याबरोबर प्रथिनं आणि जीवनसत्त्वांचे प्रमाणही तपासावे," असं डॉ. शशांक शहा सांगतात.

जीवनसत्त्वांच्या अभावामुळे वजन वाढू शकतं असं ते सांगतात.

6. परस्पर निर्णय नको

इंटरनेटवर माहिती वाचून परस्पर निर्णय घेऊ नये असं डॉ. शशांक शहा सांगतात. "इंटरनेटवर तेही खात्रीशीर स्तोत्रांवर माहिती मिळवायला हरकत नाही परंतु शरीराबाबतचा कोणताही निर्णय व्यक्तीने स्वतःच घेऊ नये. डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे", असं डॉ. शशांक सांगतात.

"वजन कमी करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या डाएट्सचा वापर केला जातो. त्यामुळे शरीराचं नुकसान होत आहे का?" हेसुद्धा तपासण्याची गरज असल्याचं डॉ. किरण शहा सांगतात.

प्रत्येक व्यक्तीने आहार विहाराबरोबर तणावमुक्त राहाणं, हसतमुख राहाणं आणि व्यवस्थित झोप घेणं फारच आवश्यक असल्याचं ते सांगतात.

डायबेटिस का होतो?

जेव्हा अन्नाचं पचन होतं. तेव्हा त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होऊन ते रक्तप्रवाहात जात असतं. इन्शुलिन ग्लुकोजला रक्तात, पेशींपर्यंत पोहोचवत असतं. तिथं त्याचं ऊर्जेत रूपांतर होत असतं.

परंतु डायबेटिस झाला असल्यास शरीराला ग्लुकोजचं ऊर्जेत रूपांतर करता येत नाही. कारण ग्लुकोज वहनासाठी योग्य प्रमाणात इन्शुलिन नसतं किंवा इन्शुलिन योग्यप्रकारे काम करत नसतं.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मधुमेहाचं निदान म्हणजे, स्वादुपिंडाची इन्शुलिन तयार करण्याची क्षमता 50 टक्के कमी झालेली असते. उरलेली 50 टक्के क्षमता मधुमेह नियंत्रण आणि जीवनशैलीमधील बदल यावर अवलंबून असते.

मधुमेहपूर्व स्थिती

(Pre-diabetes)

अनेक लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य पातळीपेक्षा दिसते. परंतु त्याला डायबेटिस म्हणण्याइतकी ती वाढलेली नसते. या अवस्थेला प्री-डायबेटिस असं म्हणलं जातं.

जर सामान्य पातळीपेक्षा तुमची साखरेची पातळी जास्त असेल तर तुम्हाला पूर्णपणे डायबेटिस होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे योग्यवेळीच त्याची कल्पना आल्यास त्या व्यक्तीला मदत होते जर उशीर झाल्यास त्याचे परिणाम गंभीर होत जातात.

मधुमेहाचे प्रकार आणि कारणे

मधुमेहाचे प्रामुख्याने दोन मुख्य प्रकार आहेत: टाइप १

(Type 1) आणि टाइप २ (Type 2).

टाइप १ मधुमेह: हा सामान्यतः लहान वयात किंवा पौगंडावस्थेत आढळतो आणि शरीरातील स्वादुपिंड (pancreas) पुरेसे इन्शुलिन (insulin) तयार करू शकत नाही तेव्हा होतो.

टाइप २ मधुमेह: हा सर्वात सामान्य प्रकार आहे, जो बहुतेकदा ४० वर्षांवरील व्यक्तींमध्ये (परंतु आता कमी वयाच्या लोकांमध्येही) दिसून येतो. यामध्ये शरीर इन्शुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही इन्शुलिन प्रतिरोधकता).

मधुमेहाची प्रमुख कारणे आनुवंशिक (genetic) आणि जीवनशैलीशी संबंधित आहेत. कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असल्यास धोका वाढतो. तसेच, लठ्ठपणा (obesity), बैठी जीवनशैली, अपायकारक आहार आणि व्यायामाचा अभाव ही टाइप २ मधुमेहाची मुख्य कारणे आहेत.

लक्षणे आणि निदान

मधुमेह हा ''सायलेंट किलर'' म्हणूनही ओळखला जातो कारण सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. तरीही, काही सामान्य लक्षणांमध्ये वारंवार लघवी होणे, खूप तहान लागणे, जास्त भूक लागणे, वजन कमी होणे, जखमा लवकर बऱ्या न होणे आणि दृष्टी अस्पष्ट होणे यांचा समावेश होतो. रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी HbA1c यासारख्या रक्त चाचण्यांद्वारे याचे निदान केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'गोव्याचे लोक मला ओळखतात', ढवळीकरांनी दिली प्रतिक्रिया; पूजा नाईकच्या आरोपांवर नेमकं काय म्हणाले? पाहा VIDEO

"त्याला संघात का घेतलं?" टीम इंडियाच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू संतापला, 'या' खेळाडूला वगळल्याने नाराजी

Jasprit Bumrah Record: W,W,W,W,W... 'बुमराह एक्स्प्रेस' सुसाट! आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्स घेत रचला इतिहास; अश्विनला टाकलं मागे Watch Video

Bihar Election Results 2025: 'बिहारच्या जनतेनचा पुन्हा PM मोदींवर विश्वास', मडगावात मुख्यमंत्री सावंतांनी कार्यकर्त्यांसोबत केला NDA चा विजयोत्सव साजरा!

Pooja Naik: "नोकरी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा सहभाग नाही", आरोपी पूजा नाईकचा मोठा खुलासा; तपासाची दिशा बदलली

SCROLL FOR NEXT