Diabetes: मधुमेहाचा हाडांवरही होतो गंभीर परिणाम, इतरांच्या तुलनेत मधुमेही रुग्णांना फ्रॅक्चरचा धोका जास्त

Diabetes Increases Fracture Risk: काही अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मधुमेही रुग्णांना सामान्य लोकांपेक्षा हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका जास्त असतो.
Diabetes Increases Fracture Risk
DiabetesDainik Gomantak
Published on
Updated on

देशात गेल्या काही वर्षात मधुमेही रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. सामन्यत:हा मधुमेहास रक्तातील साखरेचा आजार मानला जातो, परंतु तो शरीराच्या अनेक अवयवांना हळूहळू नुकसान पोहोचवू शकतो. हा केवळ डोळे, मूत्रपिंड किंवा हृदयापुरता मर्यादित न राहता त्याचा हाडांवरही खोलवर परिणाम होतो. काही अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मधुमेही रुग्णांना सामान्य लोकांपेक्षा हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका जास्त असतो.

दरम्यान, मधुमेही रुग्णांची हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे त्यांची लवचिकता आणि ताकद कमी होते. हाडांचा हा कमकुवतपणा बाहेरुन दिसत नाही, परंतु त्यांची रचना आतून बदलू लागते. यामुळे अगदी लहान दुखापतीमुळेही गंभीर फ्रॅक्चर होऊ शकते. टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह हाडांवर परिणाम करतात. यामध्येही टाइप 1 मधुमेह (Diabetes) अधिक धोकादायक आहे.

Diabetes Increases Fracture Risk
Diabetes: मधुमेही रुग्णांनी दिवसातून किती वेळा साखरेची पातळी तपासावी? हालगर्जीपणा पडू शकतो महागात

हाडे कमकुवत का होतात?

रक्तातील साखरेचे असंतुलन- जेव्हा शरीरातील साखरेची पातळी दीर्घकाळापर्यंत जास्त राहते तेव्हा ती हाडांच्या पेशींना नुकसान पोहोचवते.

इन्सुलिनची भूमिका- इन्सुलिन केवळ साखर नियंत्रित करत नाही तर हाडे तयार करण्यास देखील मदत करते. मधुमेहात इन्सुलिनची कमतरता किंवा त्याची अकार्यक्षमता यामुळे हाडांचे नुकसान होते.

नसा आणि डोळ्यांवर परिणाम- मधुमेह शरीराच्या नसा कमकुवत करतो, ज्यामुळे संतुलन बिघडू शकते आणि धोका वाढू शकतो.

कोणते भाग जास्त प्रभावित होतात?

मधुमेही रुग्णांना कंबर, पाठीचा कणा, हात आणि पायांच्या हाडांमध्ये फ्रॅक्चर होण्याचा धोका जास्त असतो. कधीकधी गंभीर दुखापत न होताही हाडे तुटू शकतात.

Diabetes Increases Fracture Risk
Diabetic Diet: गोड खाण्याची तल्लफ! मधुमेही रुग्ण खाऊ शकतात 'हे' गोड पदार्थ, वाचा काय सांगतात तज्ञ

प्रतिबंधात्मक उपाय

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा- दररोज साखरेची पातळी तपासा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा.

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी- हाडे मजबूत ठेवण्यासाठी आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चा समावेश करा.

व्यायाम- हाडे मजबूत ठेवण्यासाठी दररोज हलका व्यायाम करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com