Sameer Panditrao
आपल्या जीवनशैलीत बदल करून डायबेटिस रिव्हर्स करणं पूर्ण शक्य आहे.
अतिरिक्त धान्ये, प्रोसेस्ड फूड, रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्स व अतिरिक्त साखरेचं सेवन कमी करणे हे अत्यंत आवश्यक आहे.
नैसर्गिक, संपूर्ण अन्नपदार्थ जसे की भाजीपाला, कडधान्ये, नट्स, बिया, आणि योग्य प्रमाणात प्रोटिन (1gm/kg body weight) आहारात घ्यावं. लो-ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ निवडणे फायदेशीर.
दररोज किमान ३०-४५ मिनिटं चालणं, व्यायाम, स्ट्रेंथ ट्रेनिंग यामुळे पेशींची इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.
अपुरी झोप आणि क्रॉनिक स्ट्रेसमुळे कोर्टिसोल वाढतं, ज्यामुळे रक्तातील साखरही वाढते. ध्यान, योग, श्वसनक्रिया करून मानसिक स्थैर्य साधणं सुद्धा तितकच आवश्यक आहे.
मॅग्नेशियम, व्हिटॅमिन D, ओमेगा-३ फॅटी एसिड्सची कमतरता डायबेटीस वाढवते. चाचण्या करून कमतरता भरून काढणं महत्त्वाचं आहे.
डायबेटिस रिव्हर्सल म्हणजे आजार पूर्ण बरा होतो असं नाही; पण औषधांशिवाय नॉर्मल ब्लड शुगर लेव्हल राखता येणं.