Crispy Pakoda Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Crispy Pakoda Recipe: कुरकुरीत पकोडे बनवण्यासाठी फॉलो करा या किचन टिप्स

तुम्ही केलेले पकोडे बाजारात मिळतात तसे क्रिस्पी नाही होत का?

दैनिक गोमन्तक

तुमचे पकोडे बाजारात मिळतात तसे क्रिस्पी नाही होत का? आपण विचार करत असाल की शेवटी काय कमी पडले आहे किंवा या मिश्रणामध्ये काय जास्त झालं आहे? असे किती प्रश्न तुमच्या मनात घिरट्या घालत असतील. पण टेन्शन घेऊ नका, आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रिक्स सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या बनवलेल्या पकोड्यांना प्रत्येक वेळी क्रिस्पी आणि अप्रतिम टेस्ट देऊ शकता. (Crispy Pakoda Recipe)

अशा प्रकारे पीठ तयार करा

पकोड्यांसाठी पिठ तयार करतांना नेहमी थंड पाण्याचा वापर करा. पाण्याचे प्रमाण लक्षात घ्या. एकावेळी पुर्ण पाणी न घातला,हळूहळू पाणी घाला जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.

तुम्ही पिठात तांदळाचे पीठ देखील घालू शकता, यामुळे पकोडे कुरकुरीत होतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉर्न फ्लोअरही वापरू शकता.

पीठ बनवताना तुम्ही त्यात काही थेंब गरम तेल टाकू शकता, यामुळे पकोडेही कुरकुरीत होतात.

पकोड्यांचे पीठ काळजीपूर्वक तयार करा, ते पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही यांची काळजी घ्या.

भाजी कापण्याची पद्धत सुद्धा माहीत असायला हवी. पकोड्यांसाठी तुम्ही जी काही भाजी कापत आहात, ती खूप बारीक किंवा खूप जाड कापलेली नसावी. भाजी कापून झाल्यानंतर थोडावेळ मीठ लावून ठेवा.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • पकोडे तळण्यासाठी तेल योग्य प्रमाणात गरम करणे आवश्यक आहे, अन्यथा पकोडे मऊ होतील आणि कुरकुरीत होणार नाहीत.

  • पकोड्यांसाठी तेल पुरेसे गरम झाल्यावरच त्यात पकोड्यांचे मिश्रण घाला. मग ते कुरकुरीत तयार होतील.

  • आणि गरमागरम पकोडे सॉस किंवा दह्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Double Century: 28 षटकार, 53 चेंडू अन् 204 धावा! 15 वर्षीय 'वैभव'चा ऐतिहासिक धमाका, झळकावले सर्वात वेगवान द्विशतक; वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय

Surya Gochar 2026: वर्ष संपण्यापूर्वी 'या' 5 राशींची चांदी! सूर्य गोचरने बदलणार दिवस; होणार मोठा धनलाभ

Goa Politics: पर्रीकरांचा करिष्मा नाही, विरोधकांची एकजूटही नाही; गोव्यात भाजपपुढे सत्तेचे आव्हान

Pakistan Sindh Protest: कराचीच्या रस्त्यांवर 'सिंधुदेश'चे नारे! असीम मुनीरच्या विरुद्ध उसळला जनक्षोभ; पाकिस्तानच्या विभाजनाची चाहूल?

Satish Timbale Trophy: बंद पडलेल्या शालेय क्रिकेटला पणजी जिमखान्याची संजीवनी; 16 वर्षांखालील 8 संघ भिडणार

SCROLL FOR NEXT