Mushroom Recipe: घरीच घ्या रेस्टॉरंटसारख्या 'मटर मशरूम मसाला' चा आस्वाद

Matar mushroom masala recipe: बहुतेक लोक मटार आणि मशरूम खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जातात, परंतु हा पदार्थ घरी देखील सहज बनवता येतात.
Matar mushroom masala recipe
Matar mushroom masala recipeDainik Gomantak
Published on
Updated on

तुम्हाला जर रेस्टॉरंटसारखी मटर मशरूम मसालाची चव हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मटर मशरूम मसाला हा या पदार्थांपैकी एक आहे, जो मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच आवडतो. बहुतेक लोक मटार आणि मशरूम खाण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जातात, परंतु हा पदार्थ घरी देखील सहज बनवता येतो. ते बनवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. मसालेदार पद्धतीने मटार घालून बनवल्यास चव आणखी वाढते. चला तर मग जाणुन घेउया ही रेसिपी बनवण्याची सोपी पध्दप कोणती आहे. (Matar mushroom masala recipe News)

1 वाटी हिरवे वाटाणे
200 ग्रॅम मशरूम

पेस्टसाठी लागणारे साहित्य
3 बारिक चिरलेले कांदे
150 ग्रॅम काजू
100 ग्रॅम दही
तेल

इतर साहित्य:
1/2 टीस्पून संपूर्ण गरम मसाला
2 तमालपत्र
1 टीस्पून लसूण-आले पेस्ट
1 टीस्पून लाल मिरची पावडर
2 टीस्पून धने पावडर
चवीनुसार मीठ
1/2 टीस्पून जिरे पावडर
1/2 टीस्पून गरम मसाला
1/4 टीस्पून कसुरी मेथी

Matar mushroom masala recipe
Immunity Boosting Foods: 'या' 6 गोष्टींमुळे इम्यून सिस्टम मजबूत होईल, आजपासूनच त्यांचा आहारात समावेश करा

* मटार आणि मशरूम मसाला बनवण्याची पध्दत

सर्व प्रथम एका पातेल्यात मध्यम आचेवर पाणी उकळून मटार गाळून घ्या.

यानंतर पुन्हा पाणी उकळून त्यात हळद, मीठ टाका आणि मशरूमचे चार भाग

करा.

नंतर तेलामध्ये काजू ,कांदा हलका तपकिरी होईपर्यंत तळा.

नंतर थंड पाण्यात टाकावे.

सर्व साहित्य एकत्र करून काजू, कांदा आणि दही यांची बारीक पेस्ट बनवा.

नंतर आलं-लसूण पेस्ट घालून २ मिनिटे परतून घ्या. लाल तिखट, धनेपूड आणि मीठ घालून एक मिनिट शिजवा.

नंतर त्यात तळलेली पेस्ट घाला, 10 मिनिटे शिजवा आणि त्यानंतर कसुरी मेथी, मटार आणि मशरूम घाला.

पाच मिनिटे शिजवा, गरम मसाला घाला, चांगले मिक्स करा.

मटर मशरूम मसाला तयार आहे. कोथिंबीर टाकुन सजवा.

मशरूम खाण्याचे फायदे

* हृदय निरोगी राहते

मशरूमच्या सेवनाने हृदयाचे (Heart) आरोग्य निरोगी राहते. मशरूममध्ये हाय न्यूट्रियंट्स आणि अनेक प्रकारचे एन्झाइम्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यास हृदयविकाराचे प्रमाणात कमी होतो.

* मधुमेहाच्या रुग्णासाठी फायदेशीर

मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठीही मशरूम खूप फायदेशीर आहे. मशरूममध्ये साखर अजिबात नसते. मशरूमच्या सेवनाने शरीरात इन्सुलिनची पातळी नियत्रंणात राहते.

* पोटाच्या समस्यांपासून मुक्ती

मशरूमच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी पोटाच्या समस्या दूर होतात. फॉलिक अॅसिडमुळे ते शरीरात रक्त बनवण्याचेही काम करते.

* हाडाचे आरोग्य राहते निरोगी

मशरूमच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. त्यात व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन डीच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com