Joyful Life|Good Habits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Life Tips: आनंदी आणि समाधानी आयुष्यासाठी 'या' सवयींचे वचन द्या स्वत:ला

गोमन्तक डिजिटल टीम

आयुष्यात आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी आपण सर्वजण धडपड करत असतो. आनंद शोधण्यासाठी अनेक उपाय करून पाहिले जातात. कुणाला खरेदी, प्रवास, खेळ किंवा आणखी काही गोष्टी केल्याने आनंद मिळतो. पण अशी एक वेळ येते की आपलं मन सगळ्या गोष्टींनी भरून जातं आणि काहीही करावंसं वाटत नाही. अशा परिस्थितीत जीवनात आनंदी कसे राहायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यावेळी काय कराव यावरच आज आपण माहिती पाहणार आहोत.

अपेक्षेतून होतो निरशेचा जन्म (Avoid Too Much Expectation)

नकळत का होईना आपण लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतो आणि मग अपेक्षाभंग होतो तेव्हा निराशा येते व दुरावा निर्माण होतो. आपल्या मनात काय आहे याची इतरांना कल्पना नसते, आपल्या रागाची कारणे कळत नाहीत. त्यामुळे आपण इतरांकडून कोणतीही अपेक्षा करू नये. यामुळे आपला आनंद आणि समाधान आबाधित राहील.

सकाळी लवकर उठा (Rise Early)

स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा सकाळी उठण्याची सवय स्वत:ला लावून घ्या. सकाळी लवकर उठल्याने तुमच्या अर्ध्या समस्या दूर होतील. लवकर उठून तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर करता, त्यामुळे तणाव कमी होतो आणि स्वतःसाठीही वेळ काढू शकता. हा एक वेगळा आनंद आणि समाधान असते.

दररोज न चुकता वर्कआउट करा (Daily Workout)

दररोज न चुकता वर्कआउट करणे ही फारच चांगली आणि आरोग्यदायी सवय आहे. वर्कआऊट केल्याने तुम्हाला खूप हलकं वाटेल. व्यायाम केल्याने शरीरातील जडपणा दूर होतो तसेच, तणावमुक्त वाटते. त्यामुळे दिवसाची चांगली सुरूवात व्हावी यासाठी दररोज न चुकता वर्कआउट करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Bicholim: ..शुभ्र जलधारा कोसळती! डिचोलीतील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; आबालवृद्ध लुटताहेत आनंद

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

SCROLL FOR NEXT