सरकारी गोदामातील 241 टन तूर डाळ सडली होती. तसेच 10 टन साखर खराब झाली होती. यासाठी जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज पुन्हा केले आहे.
( Toor Dal rotting Chief Minister Pramod Sawant reiterates strict action will be taken on erring officials)
विरोधी पक्षांनी यावरुन यापुर्वीच गदारोळ घालणे सुरु केल्यावर राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना आपण योग्य ती कारवाई करु असे म्हटले होते. मात्र या प्रकरणात आता पर्यंत केवळ एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे. मात्र तत्कालीन मंत्र्यांना कोणत्या ही प्रकारे कारवाई अथवा चौकशीला सामोरे जावे लागलेले नाही. यावरुन ही विरोधी पक्ष आक्रमक झाले होते.
यावर आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिले असून अन्न - धान्य नासाडी बाबत सचिवांनी सर्व गोदामांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. काही गोदामांची परिस्थिती कदाचित खराब असेल पण ते वाया जाण्याचे कारण सांगता येणार नाही. खाद्यपदार्थ ठराविक दिवसात वापरायला हवे होते. असे ही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामूळे आणखी कोणावर कारवाई होणार का ? झाली तर ती फक्त अधिकाऱ्यांवर होणार की तत्कालीन मंत्र्यांवर ही होणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
बारदेझच्या मामलतदारावर कारवाईबाबत अधिक बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले
राज्यात `150 ठिकाणी कागदपत्रांची फेरफार करुन जमीन बळकावल्याचे प्रकार घडल्याची बाब समोर आली आहे. यावरुन गुन्हे अन्वेषन शाखेने आत्तापर्यंत 15 व्यक्तींना अटक केली आहे. यावरुन बारदेझच्या मामलतदारावरील कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगत अधिक भाष्य करणे टाळले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.