Breakfast: Coconut Smoothie चा घ्या आस्वाद  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Breakfast: Coconut Smoothie चा घ्या आस्वाद

तुम्ही कधी नारळाची स्मुदी (Coconut Smoothie) बनवली आहे का?

दैनिक गोमन्तक

आत्तापर्यंत तुम्ही आंबा आणि केळी यासारख्या फळांच्या अनेक प्रकारच्या स्मुदी ट्राय केल्या असतील. पण तुम्ही कधी नारळाची स्मुदी (Coconut Smoothie) बनवली आहे का? नारळाची स्मुदी चवीला खूप स्वादिष्ट असते. ही बनवायला देखील सोपी आहे. तुम्ही नाश्त्यासाठी किंवा इतर कोणत्याही प्रसंगी बनवू शकता. यासाठी नारळ, भाजलेले बदाम आणि काजू इत्यादीपासून तयार करता येते. चला तर मग जाणून घेवूया रेसिपी.

* नारळ स्मूदीसाठी साहित्य

  • कच्च नारळ - 11/2 कप

  • मध- 4 चमचे

  • लिंबाचा रस- 1 चमचा

  • काजू- 5

  • नारळाचे दूध- 2 कप

  • लाइम जेस्ट - 1/2 छोटा चमच

  • बदाम- 6

* कृती

नारळाची स्मुदी (Coconut Smoothie) बनवण्यासाठी, नारळ आणि दुध मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्यावे.

नंतर मध आणि लिंबू मिक्स करावे. या मिश्रणात बर्फाचे तुकडे , काजू आणि बदाम मिक्स करावे. परत एकदा मिक्सरमध्ये चांगले बारीक करावे.

सर्वात शेवटी एका ग्लासमध्ये घेवून आपल्या आवडीनुसार सजवू शकता.

* नारळ आरोग्यदायी

नारळाचे (Coconut) पाणी आरोग्यदायी असते. यामुळे आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. नारळ आरोग्यासह (Health) त्वचेसाठी (Skin) देखील फायदेशीर आहे. दक्षिण भारतात नारळाचे (Coconut) पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात. नारळाचे तेल, दूध आणि पाणी आरोग्यदायी (Health) असते. यात फायबर, मॅंगनीज, लोह, जस्त, फॉस्फरस आणि पोटॅशियम यासारखे पोषक घटक असतात. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकरकशक्ती (Immunity) वाढण्यास मदत मिळते. तसेच आपली पचन संस्था सुरळीत राहण्यासाठी नारळाचे पाणी फायदेशीर ठरते. निरोगी आरोग्यासाठी नारळ गुणकारी ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT