Evening Workout Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Evening Workout: संध्याकाळी व्यायाम करायला हवा की नको? जाणून घ्या

Health Tips: व्यायाम हा निरोगी जीवनशैलीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण "कधी व्यायाम करावा?" हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

Sameer Amunekar

व्यायाम हा निरोगी जीवनशैलीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण "कधी व्यायाम करावा?" हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. काही लोक सकाळी व्यायाम करणे योग्य मानतात, तर काहींना संध्याकाळची वेळ जास्त सोयीची वाटते. आज आपण जाणून घेऊया की संध्याकाळी व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही.

संध्याकाळी व्यायामाचे फायदे

संध्याकाळपर्यंत शरीर पूर्णपणे जागृत आणि कार्यक्षम झालेलं असतं. त्यामुळे संध्याकाळी व्यायाम करताना कामगिरी अधिक चांगली होते. दिवसभराच्या हालचालीमुळे शरीरातील स्नायू गरम झालेले असतात, त्यामुळे स्ट्रेचिंग व इतर व्यायाम प्रकार करताना इजा होण्याचा धोका कमी असतो.

ऑफिस किंवा घरच्या कामांमुळे दिवसभराचा तणाव संध्याकाळी जमा झालेला असतो. व्यायाम केल्याने डोके शांत होतं, मूड सुधारतो आणि चांगली झोप लागते. संध्याकाळी व्यायाम केल्यास शरीराला थकवा जाणवतो, त्यामुळे झोप लवकर लागते व झोपेची गुणवत्ता सुधारते.

संध्याकाळी व्यायामाचे तोटे

रात्री उशिरा व्यायाम केल्यास अ‍ॅड्रेनालिन आणि हॉर्मोन्स सक्रिय होतात, त्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. ऑफिसमधून परतल्यावर अनेक लोक थकलेले असतात किंवा कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची गरज असते.

त्यामुळे नियमितपणे व्यायाम करणे कठीण होऊ शकते.संध्याकाळी अनेक लोक जिम किंवा पार्कमध्ये येतात, त्यामुळे साधने वापरण्यासाठी थांबावे लागते.

संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत व्यायाम केल्यास शरीरातील तापमान जास्त असते, त्यामुळे शरीर अधिक सक्रिय असते. ह्याच वेळी शरीराची ताकद, स्टॅमिना आणि सहनशक्ती यांचे प्रमाणही सर्वोच्च असते. त्यामुळे संध्याकाळी व्यायाम केल्याने जास्त परिणामकारकतेने फिटनेस साधता येतो.

या लोंकासाठी संध्याकाळचा व्यायाम योग्य

  • ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही.

  • रात्री झोपण्यापूर्वी काही वेळ स्वतःसाठी हवा आहे.

  • दिवसभराचा मानसिक तणाव कमी करायचा आहे.

  • व्यायामासाठी नियमित वेळ निघत नसेल, पण संध्याकाळची वेळ ठरवता येत असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: थोड्याशा पैशांकरता केलेल्या भ्रष्टाचारामुळे माणसे जळून, गुदमरून मेली; ही आग खूप दूरवर लागेल...

Video: FA9LA ची 'ट्रेंडिंग' स्टेप अक्षयने बसवली! डान्स कोरियोग्राफरचा खुलासा; म्हणाला, लडाखची उंची, हातात ऑक्सिजन सिलिंडर घेऊन तो...

हडफडे दुर्घटना; समिती नेमली, पाहणीही झाली! पण कारवाई होणार का? 'लईराई जत्रोत्सवा'च्या दुर्घटनेचा अहवाल आजही धूळ खात - संपादकीय

Goa Nightclub Fire: 'हा अपघात नव्हे, 25 जणांचा खून! हडफडे नाईटक्लब दुर्घटनेवरून आमदार लोबो संतापले; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा 'चॅप्टर' कोणी 'क्लोज' केला?

SCROLL FOR NEXT