Health Checkup: लपलेले आजार ओळखायचेत? मग फुल बॉडी चेकअप करायला विसरु नका

Importance Of Health Checkups: आजच्या धकाधकीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत. एखादा आजार शरीरात हळूहळू वाढत चालला असल्याचे आपल्याला कळतही नाही.
Health Checkup
Health CheckupDainik Gomantak
Published on
Updated on

Which Diseases Are Identified From Getting Full Body Checkup

आजच्या धकाधकीच्या युगात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत. एखादा आजार शरीरात हळूहळू वाढत चालला असल्याचे आपल्याला कळतही नाही. मात्र जेव्हा आजाराची लक्षणे दिसू लागतात तेव्हा शरीर साथ सोडू लागते. म्हणून, वेळोवेळी संपूर्ण शरीराची तपासणी करणे गरजेचे ठरते. संपूर्ण शरीर तपासणी करण्याचे अनेक फायदे आहेत. या तपासणीच्या माध्यमातून आपल्याला कोणता आजार जडला आहे हे कळते. यामुळे वेळेवर उपचार घेण्यास मदत होते.

अशा परिस्थितीत, कोणत्या चाचण्या आरोग्यासाठी (Health) फायदेशीर आहेत त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. खरे तर, आज आपण एका विषारी आणि प्रदूषित वातावरणात जगत आहोत. चुकीच्या खाण्याच्या सवयी, बदलती जीवनशैलीमुळे अनेक प्रकारचे आजार जडू लागले आहेत. याशिवाय, अनुवांशिक समस्यांमुळेही अनेक प्रकारच्या आजाराचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत, जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण शरीर तपासणी केली तर धोका कमी होऊ शकतो.

Health Checkup
Heart Attack Prevention Tips: हृदयविकार टाळण्यासाठी आहारात काय बदल करावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

संपूर्ण शरीर तपासणी करण्याचे काय फायदे आहेत?

आरोग्य तज्ज्ञ डॉ. समीर भाटी सांगतात की, कोणतीही चाचणी किंवा स्कॅन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे असते. कर्करोगाचे (Cancer) निदान करण्यासाठी ब्लड तपासणी नाही. महिलांमध्ये पॅप स्मीअरने गर्भाशयाच्या कर्करोगाची चाचणी करता येते. ब्लड तपासणी व्यतिरिक्त, पोटाची चाचणी देखील आपण केली पाहिजे. हृदयासाठी बीपी चाचणी, शुगर चाचणी आहे. वेळेवर चाचणी केल्यास आजार सहज बरा होऊ शकतो. यासाठी योग्य वेळी योग्य चाचणी करणे महत्वाचे असते.

Health Checkup
Heartburn Or Heart Attack: छातीत होणारी जळजळ आणि हृदयविकाराचा झटका यात काय फरक असतो? जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

या चाचण्या कराव्यात

हृदयाची चाचणी: रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि ईसीजी चाचण्या हृदयाची स्थिती स्पष्ट करतात आणि हृदयाशी संबंधित आजारांना प्रतिबंधित करु शकतात.

किडनी आणि लिव्हरची चाचणी: लिव्हरचे आरोग्य तपासण्यासाठी एलएफटी चाचणी केली जाते.

किडनी फंक्शन चाचणी: किडनीच्या आजारांची तपासणी करण्यासाठी KFT चाचणी केली जाते.

लिपिड प्रोफाइल आणि यूरीन चाचणी: या चाचणीच्या माध्यमातून कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी मोजते येते.

हाडांची मजबूती: कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चाचणी करुन हाडांचा कमकुवतपणा आणि ऑस्टियोपोरोसिसचे निदान होते.

थायरॉईड विकार: टीएसएच चाचणीमुळे थायरॉईड योग्यरित्या कार्य करत आहे की नाही हे कळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com