Manish Jadhav
ओवा हा मसाल्यांमधील एक महत्त्वाचा घटक आहे. ओवा केवळ अन्नाची चवच वाढवत नाहीतर त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.
ओव्यात थायमॉल नावाचे एक संयुग असते, जे दाहक-विरोधी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याचे काम करते.
आज (10 एप्रिल) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून ओवा आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याबाबत जाणून घेणार आहोत.
ओवा पचनक्रिया सुधारण्यास, सर्दी आणि खोकल्यापासून आराम देण्यास, वजन कमी करण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो.
ओव्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात.
ओव्यात असणारे थायमॉल संयुग रक्तदाब कमी करण्यास मदत करते. हे रक्तवाहिन्यांना आराम देते.