rock salt  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

नवरात्रीच्या उपवासात आपण सैंधव मिठाचे सेवन का करतो, जाणून घ्या त्याचे फायदे

सैंधव मीठ हे मीठाचे सर्वात शुद्ध रूप मानले जाते.

दैनिक गोमन्तक

Navratri Diet 2022: यावर्षी 2 एप्रिलपासून नवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे. तेव्हा मातेला प्रसन्न करण्यासाठी लोक केवळ 9 दिवसात देवीची पूजा करतात आणि उपवास करून तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत उपवासाच्या वेळी फळांचे सेवन करण्यासोबतच लोक त्यांच्या जेवणात सैंधव मिठाचाही वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का की, नवरात्रात उपवासाच्या वेळी सैंधव मिठाचे (rock salt) सेवन सुरू केले जाते. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की आपण सैंधव मीठ का सेवन करतो. यासोबतच तुम्हाला त्याचे फायदेही कळतील.

आपण सैंधव मीठ का सेवन करतो?

सैंधव मीठ हे मीठाचे सर्वात शुद्ध रूप मानले जाते. त्याचबरोबर ते बनवताना त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. दुसरीकडे, जर आपण सामान्य मीठाबद्दल बोललो, तर सामान्य मीठाला अनेक रासायनिक प्रक्रियांमधून जावे लागते, ज्यामुळे कॅल्शियम, पोटॅशियम इत्यादी आवश्यक पोषक घटक कमी होतात. यामुळेच उपवासाच्या वेळी सैंधव मिठाचे सेवन केले जाते, ज्यामुळे शरीराला अधिक पोषक तत्त्वे मिळू शकतात. याशिवाय आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत.

सैंधव मिठाचे फायदे

  • पचनसंस्थेला निरोगी बनवण्यासाठी सैंधव मिठाचा खूप उपयोग होऊ शकतो. जर तुम्हाला उलट्या किंवा मळमळ यासारख्या समस्या होत असतील तर लिंबाचा रसात सैंधव मिठ मिसळा आणि थोडं पाणी घालून पिऊन घ्या.

  • सैंधव मीठ डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. सैंधव मीठामुळे दूर दृष्टीचा आजार कमी होतो.

  • रक्‍तदाब नियंत्रणात ठेवण्‍यासाठी सैंधव मिठाचाही खूप उपयोग होतो. सैंधव मिठात कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते.

  • जे लोक लवकर थकतात त्यांनी सैंधव मिठाचे सेवन करावे, यामुळे रक्तदाबाची समस्या कमी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT