Astro Tips For Shoes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips For Shoes: घरात 'या' ठिकाणी शूज अन् चप्पल ठेवणे मानले जाते अशुभ

वास्तुशास्त्रानुसार घरात कोणतीही वस्तू ठेवण्याची पद्धत सांगितली आहे. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Puja Bonkile

Astro Tips For Shoe: वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तर नकारात्मक ऊर्जे घरातून निघून जाते. वास्तूनुसार घरात कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी एक निश्चित जागा आणि दिशा सांगितलेली आहे. या दिशांची काळजी घेतल्यास घरात कोणतेही समस्या येणार नाही.

वास्तुशास्त्रानुसार शूज आणि चप्पल योग्य ठिकाणी ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. त्यासाठी ठराविक जागा निश्चित केली आहे. जर एखाद्या व्यक्तीने हे नियम पाळले नाहीत तर घरात आर्थिक संकट येऊ शकते. एवढेच नाही तर माणसाला आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 

  • घरात या ठिकाणी शूज आणि चप्पल काढू नये

वास्तुशास्त्रानुसार शूज आणि चप्पल कधीही तुळशी जवळ ठेवू नये. असे केल्यास घरात गरिबी येऊ शकते आणि त्रासही वाढू शकतो. इतकंच नाही तर संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते.

  • बेडरूम

शूज आणि चप्पल बेडरूममध्ये कधीच काढू नका. कारण वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. असे केल्याने पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा कमी होऊ शकतो.

  • मुख्य प्रवेशद्वार

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बूट आणि चप्पल कधीही काढू नये. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. वास्तुनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चप्पल काढू नये.

  •  स्वयंपाकघर

शूज आणि चप्पल स्वयंपाकघरात काढणे म्हणजे अन्न आणि अग्नि देवाचा अपमान करणे होय. त्यामुळे स्वयंपाकघरात चप्पल कधीही काढू नये.

  • योग्य दिशा कोणती?

वास्तुशास्त्रानुसार घरातील सर्व शूज आणि चप्पल एकत्र करून शू रॅकमध्ये ठेवावे. यानंतर शू रॅक घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे वास्तुनुसार शुभ मानले जाते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT