Vastu Tips: घराच्या खिडकीजवळ चुकूनही ठेऊ नका 'या' वस्तु, अन्यथा भासेल आर्थिक चणचण

वास्तुशास्त्रानुसार घराच्या खिडक्याजवळ काही वस्तु ठेवणे अशुभ मानले जाते.
Vastu Tips For Window
Vastu Tips For WindowDainik Gomantak
Published on
Updated on

Vastu Tips For Home: घर बांधताना वास्तुशास्त्रात सांगितलेले नियम पाळल्यास कोणत्याही समस्या निर्माण होणार नाही. वास्तुशास्त्रानुसार घराच्या खिडक्या आणि दरवाजे सकारात्मक ऊर्जा वाढवतात. तसेच घरात सुख -समृद्धी देखील राहते. वास्तुनुसार घराच्या खिडकीसमोर काही खास वस्तु ठेवणे अशुभ ठरू शकते. या वस्तु कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

  • खिडकीसमोर डिश किंवा अँटिना

वास्तुशास्त्रानुसार खिडकीसमोर डिश किंवा अँटेना ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. यामुळे त्याचा परिणाम घरातील कुटूंबांच्या आर्थिक स्थितीवर आणि आरोग्यावर होतो. म्हणून खिडकीसमोर डिश किंवा अँटिना ठेऊ नये.

  • हवा खेळती असावी

घरातील खिडक्या दररोज थोडा वेळ उघडल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. वास्तुशास्त्रानुसार घरात नैसर्गिक प्रकाश येणे शुभ मानले जाते. घरात प्रसन्न वातावरण राहते.

Vastu Tips For Window
White Shoes Cleaning Tips: पांढरे शूज स्वच्छ करण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स
  • खिडक्या उघडताना आवाज येणे

वास्तुशास्त्रानुसार घराच्या खिडक्या उघडताना कोणताही आवाज येऊ नये. कारण यामुळे बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तसेच घरात वाद निर्माण होऊ शकतो. घरातील खिडक्या वेळीच दुरूस्त कराव्या.

  • खराब किंवा जुनी वस्तु

घराच्या खिडकीजवळ चुकूनही खराब किंवा जुनी वस्तु ठेऊ नका. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तु ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील सदस्यांना आर्तिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

  • रद्दी किंवा जुने कागद

वास्तुनुसार घराच्या खिडकीजवळ रद्दी किंवा जुने कागद ठेवणे टाळावे. कारण यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. तसेच घरात गरिबी येऊ शकते. म्हणूनच जुनी रद्दी किंवा जुने कागद खिडकीजवळ ठेऊ नये.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com