Hing Water Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hing Water Benefits: पोटाच्या समस्यांवर हिंगाचे पाणी औषधापेक्षाही गुणकारी! वजनही होते कमी

औषधी गुणांनी भरलेले हे पाणी शरीराला अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवते

Kavya Powar

Hing Water Benefits: पोटाच्या समस्यांवर हिंगाचे पाणी रामबाण औषधाचे काम करते. औषधी गुणांनी भरलेले हे पाणी शरीराला अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवते. हिंगाचे पाणी गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या लवकर दूर करू शकतात.

वजन कमी करायचे असेल, हृदयविकार टाळायचा असेल तर हिंगाचे पाणी फायदेशीर आहे. तसेच हिंगाच्या पाण्याचा कर्करोग आणि मधुमेहाच्या रुग्णांनाही फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया हिंगाच्या पाण्याचे 5 जबरदस्त फायदे.

हिंगाचे पाणी कसे बनवायचे

  • एक ग्लास पाणी गरम करा.

  • गरम पाण्यात हिंग मिसळा.

  • हिंग पाण्यात चांगले विरघळवून घ्या.

  • आता सेवन करा.

हिंगाच्या पाण्याचे 5 फायदे

हृदयविकारापासून सुटका

हिंगमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करण्याचे काम करते. हे तुम्हाला जळजळ, हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेहापासून वाचवू शकते.

पचन मजबूत होते

हिंगामुळे पचनक्रिया खूप मजबूत होते. हिंग अपचन, पोटदुखी, अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून आराम देण्याचे काम करते. याचे नियमित सेवन केल्यास इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) कमी होऊ शकतो. यामुळे पोटही स्वच्छ राहते.

वजन कमी होते

हिंगाच्या पाण्याचा दररोज वापर करून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. वास्तविक, हिंग पचन सुधारते आणि वाढलेले पोट कमी करते. यामुळे लठ्ठपणाही कमी होऊ शकतो.

रक्तातील साखर नियंत्रित होते

हिंगाचा दररोज वापर केल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. रोज सकाळी हिंगाचे पाणी प्यायल्याने साखरेची पातळी कायम राहते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना हिंगाचे पाणी वापरण्याचा सल्ला दिला जातो.

चेहरा चमकतो

हिंग आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो. याचा वापर केल्याने सुरकुत्या, पिंपल्ससारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यातून पावसाची एक्झिट नाहीच! मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याचा 'यलो अलर्ट'

Sawantwadi Crime: इन्सुली नाक्यावर 94 लाख तर, वेर्ले गावात 22 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त

Goa Live News: क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला फॅन, विद्यार्थी जखमी; पर्वरी सत्तरीतील सरकारी शाळेतील घटना

पाकड्यांची मस्ती काय उतरेना... 'तुला 3 चेंडूत आऊट करेन!' पाकच्या गोलंदाजाचं अभिषेक शर्माला थेट आव्हान Video Viral

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

SCROLL FOR NEXT