Ajwain For Weight loss: बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
यामध्ये चौरस आहाराचा अभाव असणे, शरीराची कमी हालचाल , फास्ट फुडचे वाढते प्रमाण हे सगळे घटक कारणीभूत ठरतात. वाढते वजन हे सर्वात जास्त आढळणारी समस्या आहे.
वाढते वजन ही सामान्यपणे आढळणारी समस्याने आपल्या आजूबाजूचे अनेकजण त्रस्त असतात. मात्र काही गोष्टीचे पालन केले तर आपण या समस्येचा सामना करुन आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास प्रयत्नशील राहू शकतो. आज आपण वाढत्या वजनावर घरातील कोणत्या गोष्टी उपयोगी पडतील हे जाणून घेणार आहोत.
आपल्या स्वयंपाकघरात सामान्यपणे आढळणारा मसाल्यातील एक महत्वाचा मसाला म्हणजे ओवा होय. ओवा आपले वजन कमी करु शकतो. एक ग्लासभर पाण्यात रात्रभर ओवा भिजत घालून ते पाणी रोज सकाळी पिल्याने आपले वजन कमी होते. ओव्यामध्ये थायमॉल नावाचा घटक असतो जो वजन घटवण्यास मदत करतो.
थायमॉल
असे म्हटले जाते की थायमॉल चयापचय मजबूत करते, पचन सुधारते आणि अॅसिडिटीची समस्या दूर करते. याशिवाय आयोडीन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम देखील त्यात आढळतात. हे सर्व शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.
याबरोबरच, आपल्या आहाराकडे लक्ष देणे आपल्या निरोगी आरोग्यासाठी गरजेचे असते. त्यासाठी फास्ट फूडचे प्रमाण कमी करणे, शारीरीक हालचाल होईल याची काळजी घेणे वाढते वजन आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचे ठरते. याबरोबरच, जेवणाच्या वेळा पाळणे , गोड पदार्थ कमी खाणे महत्वाचे ठरते. अशा प्रकारे आपण आपल्या वजनावर नियंत्रण ठेऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.