Parliament Farewell For Ram Nath Kovind
Parliament Farewell For Ram Nath Kovind ANI
Image Story

Ram Nath Kovind यांचा संसद भवनात निरोप समारंभ; पंतप्रधान, उपराष्ट्रपतींसह सर्व खासदारांची उपस्थिती

दैनिक गोमन्तक
Parliament Farewell For Ram Nath Kovind

Parliament Farewell For Ram Nath Kovind: देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा यांचा निरोप समारंभ (Ram Nath Kovind Farewell) काल संध्याकाळी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu), लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, तसेच दोन्ही सभागृहांचे सर्व खासदारही या निरोप समारंभात सहभागी होते. यादरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निरोप दिला. तसेच संसद सदस्यांच्या वतीने राष्ट्रपतींना सन्मानपत्रही दिले.

Parliament Farewell For Ram Nath Kovind

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसद सदस्यांनी स्वाक्षरी केलेले 'स्मृतीचिन्ह' आणि 'स्वाक्षरी पुस्तक' भेट देण्यात आले. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये 18 जुलै ते 21 जुलै या कालावधीत खासदारांच्या स्वाक्षरीसाठी 'सिग्नेचर बुक' ठेवण्यात आले होते.

Parliament Farewell For Ram Nath Kovind

संसद भवन येथे निरोप समारंभ

देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. निवृत्त झाल्यानंतर त्यांच्यासाठी १२ जनपथ रोडवरच बंगला देण्यात आला आहे. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे या बंगल्यात अनेक दशकं वास्तव्य होते. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा चिराग पासवान याने हा बंगला रिकामा केला होता. यादरम्यान बराच वादही झाला.

Parliament Farewell For Ram Nath Kovind

पीएम मोदींनी दिला निरोप

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी निरोप मेजवानी आयोजित केली. या मेजवानीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही आले. दिल्लीतील हॉटेल अशोका येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे देशभरातील अनेक आदिवासी नेतेही पोहोचले. यासोबतच अनेक पद्म पुरस्कार विजेत्यांनीही निरोप समारंभात सहभाग घेतला.

Draupadi Murmu

चेस ऑफ गार्ड आयोजित होणार नाही.

द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) देशाच्या पुढील राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याच्या तयारीच्या संदर्भात फुल ड्रेस रिहर्सल आयोजित केल्यामुळे आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात गार्ड चेंज (Change of Guard Ceremony) सोहळा होणार नाही. विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचा पराभव करून द्रौपदी मुर्मू यांनी देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती होण्याचा मान मिळविला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

कोर्टात 13 महिन्यांच्या मुलाला फरशीवर फेकले; महिलेविरुद्धचा FIR रद्द करण्यास न्यायाधीशांचा नकार

Goa Today's Live News: गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार - मुख्यमंत्री डॉ. सावंत

SCROLL FOR NEXT