Uttarakhand: स्थलांतर रोखण्यासाठी उत्तराखंड सरकारचा मेगा प्लॅन

Uttarakhand News: उत्तराखंडमधील गावांमध्ये स्थलांतर ही गंभीर समस्या आहे.
Chief Minister Pushkar Singh Dhami
Chief Minister Pushkar Singh Dhami Dainik Gomantak
Published on
Updated on

Uttarakhand News: उत्तराखंडमधील गावांमध्ये स्थलांतर ही गंभीर समस्या आहे. तर दुसरीकडे, स्थलांतर रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. याच क्रमाने मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ग्राम विकास आयोगाची बैठक घेतली. या बैठकीत स्थलांतर निवारण आयोग स्थापन करण्याच्या दिशेने काम करण्यावर प्रामुख्याने चर्चा झाली.

दरम्यान, आयोगाची बैठक घेताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक ग्रामसभेत एका व्यक्तीची नियुक्ती करावी, जो तेथील सर्व समस्या सोडवण्यासाठी तत्पर असावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर स्थलांतर रोखण्यासाठी आणि गावातच रोजगार (Employment) आणि व्यवसाय उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Chief Minister Pushkar Singh Dhami
पश्चिम बंगालमध्ये EDचं धाडसत्र; मंत्री चटर्जींच्या निकटवर्तीयांकडून 20 कोटींची रोकड जप्त

दुसरीकडे, या भेटीची माहिती सीएम धामी यांनी ट्विट करुन दिली. ट्विटमध्ये मुख्यमंत्री धामी म्हणाले, 'आज सचिवालयात ग्रामीण विकास आणि स्थलांतर आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आयोगाने अहवालाद्वारे ज्या काही सूचना दिल्या आहेत, त्या सूचना प्रत्यक्षात आणण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.' ते पुढे म्हणाले, 'ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर रोखण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या आयोगाचे नाव स्थलांतर प्रतिबंधक आयोग असेल. ग्रामीण भागाच्या विकासासाठी ‘एक गाव, एक सेवक’ या संकल्पनेवर काम केले जाणार आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com