Weekly Career Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Weekly Career Horoscope: या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार! 3 राशींना मिळेल इच्छित नोकरीची सुवर्णसंधी

Career Horoscope 8th September to 14th September 2025: नवा आठवडा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत मेष, वृषभ, मिथुन यांसह सर्व १२ राशींसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा राहील.

Sameer Amunekar

नवा आठवडा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत मेष, वृषभ, मिथुन यांसह सर्व १२ राशींसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा राहील. प्रसिद्ध ज्योतिषी चिराग बेजन दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊ या की या आठवड्यात तुमच्या करिअर आणि शिक्षण क्षेत्रात परिस्थिती कशी राहणार आहे. वाचा साप्ताहिक करिअर राशीभविष्य.

मेष
या आठवड्यात हलका व्यायाम आणि ध्यान वर्ग तुमच्या एकाग्रतेत सुधारणा घडवतील. संगीत व सर्जनशील कलेचे विद्यार्थी उत्तम मार्गदर्शन मिळवतील. करिअरमधील अडथळे दूर होतील.

वृषभ
करिअरच्या दृष्टीने आठवडा थोडा चढ-उताराचा असेल. उद्दिष्ट गाठण्यासाठी मेहनत करावी लागेल. विद्यार्थ्यांनी नकारात्मक सवयींवर आणि वाईट संगतीवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

मिथुन
शैक्षणिक यशासाठी गुरुजनांचे मार्गदर्शन घ्या. नवीन कौशल्य शिकल्यास नोकरी व मुलाखतीत मदत होईल. कठोर मेहनत गरजेची आहे; स्पर्धा परीक्षेत यशाची शक्यता कमी आहे.

कर्क
उच्च शिक्षणात काही अडथळ्यांनंतर यश मिळेल. शिक्षणासाठी दूर प्रवास किंवा घरापासून दूर रहावे लागेल. सकारात्मक दृष्टिकोन फार उपयोगी पडेल. फॅशनशी संबंधित शिक्षण घेतलेले विद्यार्थी यशस्वी होतील.

सिंह
विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आजारपणामुळे त्रास होऊ शकतो. कामाचा ताण व परीक्षा दडपण जाणवेल. ध्यान व पालकांशी चर्चा करून स्पष्टता मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे.

कन्या
चांगल्या परिणामांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करा. मित्र वा नातेवाईकांकडून योग्य सल्ला मिळेल. स्पर्धा परीक्षेसाठी काळ अनुकूल आहे. नोकरीत असलेल्यांना दुसऱ्या कंपनीतून ऑफर मिळू शकते.

तुळ
उच्च शिक्षणासाठी हा आठवडा योग्य आहे. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

वृश्चिक
करिअरसाठी आठवडा चांगला आहे, पण मन अभ्यासात न लागता मित्र-भावंडांत रमण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभ्यासात नुकसान होईल. स्पर्धा परीक्षार्थींनी मेहनत वाढवावी.

धनु
उच्च शिक्षणात गोंधळाची स्थिती निर्माण होईल. याचा परिणाम परीक्षेवर होऊ शकतो. विचार न करता बदल करू नका, अन्यथा अडचणी येतील.

मकर
मेहनतीमुळे अभ्यास वा संशोधनात चांगले यश मिळेल. भाग्य साथ देईल. मन विचलित होऊ देऊ नका. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे.

कुंभ
इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नकारात्मक परिस्थितीतून घाबरू नका. ठामपणे प्रयत्न करा, शिक्षण व करिअरमध्ये प्रगती होईल.

मीन
अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरतील. स्पर्धा परीक्षेतील तयारीसाठी योग्य पाठबळ मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा सरकारला 'सर्वोच्च' दणका; प्रस्तावित व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात विकासकाम करण्यास बंदी, SC ने 2 आठवड्यांत मागितला अहवाल

PM Modi Saudi Arabia Visit: पीएम मोदींच्या जेद्दाह दौऱ्यावर कोट्यवधींचा खर्च; दोन दिवसांच्या हॉटेल बिलाचा आरटीआयमधून खुलासा

'हे काय बोलून गेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री', भाजपमध्ये लवकरच भूकंप? सोशल मिडियावर रंगली चर्चा तर विरोधक म्हणाले, 'कामत खरं तेच बोलले

Nepal Protest Explained: जाळपोळ, दगडफेक करत नेपाळमध्ये लाखो तरूण रस्त्यावर का उतरलेत? सोशल मीडिया बंदी, भ्रष्टाचार आणि तेथील राजकारण समजून घ्या

Viral Video: मुर्खपणाचा कळस! रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपला, भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, पठ्ठ्याचा व्हिडिओ पाहून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT