Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Drugs in Goa parties: रायपूर पोलिसांनी अटक केलेल्या दोन महिलांनी गोव्यातील पार्ट्यांत अमलीपदार्थ वापरण्यात आले होते अशी कबुली तेथील पोलिसांना दिली आहे.
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांत अमलीपदार्थांचा वापर होत असल्याचा आणखीन एक पुरावा समोर आला आहे. रायपूर पोलिसांनी अटक केलेल्या दोन महिलांनी गोव्यातील पार्ट्यांत अमलीपदार्थ वापरण्यात आले होते अशी कबुली तेथील पोलिसांना दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायपूरमध्ये गोव्याशी संबंधित अमलीपदार्थ व्यापाराचा मोठा खुलासा झाला असून पोलिसांनी नव्या मलिक आणि विधी अग्रवाल या दोन महिलांना अटक केली आहे. चौकशीत या दोघींनी गोव्यात आयोजित होणाऱ्या टेक्नो पार्ट्यांमध्ये अमलीपदार्थांचा वापर केल्याची कबुली दिली आहे.

Goa Drug Case
Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

पोलिसांच्या माहितीनुसार, या दोन्ही महिला दरमहा गोव्यात व मुंबईत जात असून तेथील हॉटेल, क्लब, रिसॉर्ट आणि फार्महाउसवर पार्ट्यांचे आयोजन करत असतात. या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग होत असल्याचेही उघड झाले आहे. विशेष म्हणजे, विधी अग्रवाल ही स्वतःच्या इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून या पार्ट्यांचे आयोजन करीत होती.

Goa Drug Case
Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

ड्रग्ज रॅकेटचा पोलिसांकडून शोध सुरू

राज्यातील विविध ठिकाणच्या गावांबाहेरील परिसरातील फार्म हाउसवर होणाऱ्या पार्ट्यांमध्ये अश्लील कृत्यांनाही वाव दिला जात असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटशी संबंधित आणखी धागेदोरे शोधले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Telangana Police Drug Bust
Uttar Pradesh Lover Murder Case
Patna Triple Talaq Court Judgment
Goa Drug Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com