Goa Badminton: पश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेची चुरस! गोव्याच्या रेहानीला रौप्य, भगतला ब्राँझपदक

Goa Badminton Competition: पुरुष एकेरीत गुजरातचा अधीप गुप्ता विजेता ठरला. त्याने अंतिम लढतीत गोव्याच्या अर्जुन रेहानी याला २१-१८, २१-१८ असे पराजित केले. महिला एकेरीत गुजरातच्याच ऐशानी तिवारी हिने बाजी मारली.
Goa Badminton Competition
Goa Badminton CompetitionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पश्चिम विभागीय आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेच्या वैयक्तिक गटात गोव्याच्या अर्जुन रेहानी याला रौप्यपदक मिळाले, तर ज्युनियर मुलांत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या अर्जुन भगत याला ब्राँझपदक प्राप्त झाले. स्पर्धा कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये झाली.

पुरुष एकेरीत गुजरातचा अधीप गुप्ता विजेता ठरला. त्याने अंतिम लढतीत गोव्याच्या अर्जुन रेहानी याला २१-१८, २१-१८ असे पराजित केले. महिला एकेरीत गुजरातच्याच ऐशानी तिवारी हिने बाजी मारली. तिने आपल्याच राज्यातील काव्या मार्वानिया याला नमविले. सामन्यात ऐशानी २१-१९, ७-३ अशी आघाडीवर असताना काव्या हिने दुखापतीमुळे माघार घेतली.

Goa Badminton Competition
Goa Badminton: गोव्याच्या 'आरुष'ची रोमहर्षक मुसंडी! निर्णायक राउंडमध्ये विजय; 17 वर्षांखालील स्पर्धेत जोरदार आगेकूच

ज्युनियर (१९ वर्षांखालील) मुलांत विजेतेपद मिळविताना मध्य प्रदेशच्या अव्वल मानांकित देव कुमावत याने छत्तीसगडच्या वैभव सिंग याला पिछाडीवरून १६-२१, २१-१६, २१-१४ असे पराभूत केले. ज्युनियर मुलींत काव्या मार्वानिया विजेती ठरली. अंतिम लढतीत तिने मध्य प्रदेशच्या अनुष्का शापूरकर हिला २१-१४, २१-१३ असे नमविले.

Goa Badminton Competition
Goa Badminton: म्हापसा शटलर्स बॅडमिंटन स्पर्धेत रितिकाला तिहेरी किताब! शाहीन, अवनीला दुहेरी मुकूट

दुहेरीतील अंतिम फेरी निकाल ः पुरुष दुहेरी ः एम. व्ही. अभिषेक व सुजेय तांबोळी (छत्तीसगड) वि. वि. आर्य ठाकोर व ध्रुव ठाकोर ८-२१, २१-१२, २१-१७. महिला दुहेरी ः ऐश्वर्या मेहता व प्रियांका पंत (मध्य प्रदेश) वि. वि. अनघा करंदीकर व सिया सिंग २१-१६, ७-२१, २१-१५. मिश्र दुहेरी ः आयुष मखिजा व रेणुश्री यावर्णा (छत्तीसगड) वि. वि. अजिंक्य पाठारकर व निकिता जोसेफ (महाराष्ट्र) २१-१५, १५-२१, २१-१७.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com