
Railway Track Stunt Video
सोशल मीडियाच्या युगात प्रसिद्धी मिळवण्याची धडपड इतकी वाढली आहे की अनेक तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालायला मागेपुढे पाहत नाहीत. लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या हव्यासापायी धोकादायक स्टंट करून रील्स बनवण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतो आहे. अशाच एका स्टंटचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
एका तरुणाने केवळ रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपून जीवघेणा स्टंट करण्याचा प्रयत्न केला. काही सेकंदांतच वेगात धावणारी ट्रेन त्याच्याजवळून गेली आणि उपस्थितांचा श्वास रोखला गेला. हा प्रकार अगदी थरारक असून, थोडीशी चूक झाली असती तर त्याचा जीव जाणं नक्की होतं.
हा व्हिडिओ सुनंदा रॉय यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही तासांतच हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अशा वेडेपणाला 'मुर्खपणाचा कळस' असे संबोधले आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. “फक्त थोडक्यात जीव वाचला, अशा स्टंटबाजीसाठी कठोर शिक्षा व्हायला हवी,” अशी मागणी अनेकांनी केली आहे. तर काहींनी हे कृत्य फॉलोअर्ससाठी वेडेपणाची हद्द असल्याचे म्हटले आहे.
रेल्वे पोलिसांनी अशा कृतींना गांभीर्याने घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. कारण रेल्वे परिसरात कोणतेही स्टंट करणे हा गुन्हा आहे. यामुळे केवळ स्टंट करणाऱ्याचाच नाही, तर ट्रेन चालक आणि प्रवाशांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.