Vajra Yog 2026 Dainik Gomantak
Horoscope

Vajra Yog 2026: एक चुकीचा निर्णय अन् कोट्यवधींचं नुकसान! आकाशात तयार होतोय सर्वात अशुभ योग; 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं वादळ

Asubh Vajra Yoga Astrology Effects: ज्योतिष शास्त्रामध्ये शुभ आणि अशुभ योगांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. यातीलच एक महत्त्वाचा पण बहुतांश वेळा अशुभ मानला जाणारा 'वज्र योग' लवकरच निर्माण होत आहे.

Manish Jadhav

Vajra Yoga June 2026 Timing: ज्योतिष शास्त्रामध्ये शुभ आणि अशुभ योगांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. यातीलच एक महत्त्वाचा पण बहुतांश वेळा अशुभ मानला जाणारा 'वज्र योग' लवकरच निर्माण होत आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, चालू महिना म्हणजेच जून 2026 मध्ये हा नकारात्मक योग तयार होत असून, त्याचा अत्यंत वाईट आणि प्रतिकूल परिणाम अनेक राशींच्या जीवनावर काही दिवसांपर्यंत दिसून येणार आहे.

हा अशुभ वज्र योग 19 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजून 53 मिनिटांनी सुरु होणार असून, तो पुढील दिवस म्हणजेच 20 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजून 48 मिनिटांपर्यंत प्रभावी राहील. या 24 तासांच्या कालावधीत आणि त्यानंतरच्या काही दिवसांत 5 राशींच्या जातकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या काळात या राशींनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.

या अशुभ योगाचा पहिला मोठा फटका वृषभ राशीला बसण्याची शक्यता आहे. अचानक उद्भवणाऱ्या मोठ्या खर्चामुळे या राशीच्या लोकांचे घरचे बजेट पूर्णपणे कोलमडू शकते. तसेच एखादी अत्यंत मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता असून, यामुळे मानसिक त्रास होईल. नातेवाईकांसोबतचे संबंध कमालीचे बिघडू शकतात. दुसरी राशी मिथुन असून, निष्काळजीपणामुळे त्यांची एखादी महागडी वस्तू तुटू शकते.

या काळात त्यांना गुप्त शत्रूंचा त्रास सहन करावा लागेल आणि घरातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याविषयी (Health) चिंता वाढेल. सिंह राशीच्या जातकांसाठीही हा काळ तणावपूर्ण असेल. विरोधक सक्रिय झाल्यामुळे मानसिक शांतता लाभणार नाही. नको त्या गोष्टींवर वायफळ खर्च होईल आणि व्यवसायात अपेक्षेप्रमाणे नफा मिळण्याची चिन्हे नाहीत.

धनु राशीच्या नोकरदार आणि व्यावसायिक लोकांना वाढत्या खर्चामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. आर्थिक चणचणीमुळे बँकेच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे कठीण होईल. या काळात प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तो पुढे ढकलणे योग्य ठरेल; कारण प्रवासादरम्यान आरोग्य गंभीररीत्या बिघडण्याचा मोठा धोका आहे. शेवटची म्हणजेच कुंभ राशीच्या अशा व्यक्ती ज्या आधीच एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत, त्यांचे आरोग्य अधिक खालावण्याची शक्यता आहे. व्यवसायात घाईगडबडीत किंवा विचार न करता घेतलेल्या निर्णयामांमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

तसेच, या काळात कौटुंबिक आणि वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळे कुंभ राशीचे लोक मानसिक तणावाखाली राहतील. एकंदरीत, जून महिन्यातील हा वज्र योग या पाच राशींच्या आर्थिक, शारीरिक आणि कौटुंबिक शांततेला सुरुंग लावणारा ठरु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा!' डोनल्ड ट्रम्प यांना इराणी वृत्तपत्राचा इशारा; आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ

Labh Drishti Yog 2026: तिजोरी हाऊसफुल्ल होणार, व्यापाऱ्यांना बंपर फायदा! शनी-मंगळाचा 'लाभ दृष्टी योग' बदलणार 4 राशींचे नशीब; सर्व अडचणींचा द एंड

Road Accident: लग्नाचा आनंद ठरला शेवटचा! दोन ट्रकांच्या भीषण धडकेत चिरडली पिकअप; 13 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी VIDEO

8th Pay Commission Latest Update: पगारवाढच नाही, तर बोनस आणि ग्रॅच्युइटीमध्येही होणार मोठा फेरबदल! 8व्या वेतन आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात

Report: 2027 चा वर्ल्ड कपच नाही, तर 2028 च्या ऑलिम्पिकमध्येही गौतम गंभीरच असणार टीम इंडियाचा 'बॉस'! बीसीसीआय देणार मुदतवाढ?

SCROLL FOR NEXT