Road Accident: लग्नाचा आनंद ठरला शेवटचा! दोन ट्रकांच्या भीषण धडकेत चिरडली पिकअप; 13 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी VIDEO

Indonesia Road Accident Java Island: इंडोनेशियाच्या जावा बेटावरुन एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. येथे रविवारी दुपारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला.
Indonesia Road Accident Java Island
Severely damaged pickup vehicle after a collision with two trucks in a fatal road accident in IndonesiaDainik Gomantak
Published on
Updated on

Indonesia Road Accident Java Island: इंडोनेशियाच्या जावा बेटावरुन एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. येथे रविवारी (12 जुलै) दुपारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व मृत आणि जखमी लोक एका लग्नसोहळ्याला उपस्थित राहून आनंदाने आपल्या घरी परतत होते, मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक एका उघड्या पिकअप व्हॅनमधून प्रवास करत होते, जी त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली.

स्थानिक वाहतूक पोलीस प्रमुख उडांग शरीफ हिदायत यांनी सोमवारी (13 जुलै) या घटनेची अधिकृत माहिती दिली. हा अपघात रविवारी दुपारच्या सुमारास इंद्रामायु रीजेंसीमधील कियाजारन कुलोन गावाजवळ असणाऱ्या उत्तर किनारी महामार्गावर घडला. हे सर्व लोक शेजारील पारेन गावात एका लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. लग्न संपवून घरी परतत असताना, त्यांची खुली पिकअप व्हॅन महामार्गावरील एका यु-टर्नजवळ वेग कमी करुन थांबली होती. याच दरम्यान, त्याच दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका विंग-बॉक्स ट्रकने या पिकअप व्हॅनला मागून जोरात धडक दिली.

Indonesia Road Accident Java Island
Indonesia Bus Accident: इंडोनेशियात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! भरधाव बस दुभाजकाला धडकून उलटली; 16 प्रवाशांचा मृत्यू, 18 गंभीर जखमी VIDEO

ही धडक इतकी भीषण होती की, पिकअप व्हॅन थेट रस्ता ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये फेकली गेली. दुर्दैवाने, त्याचवेळी समोरच्या लेनमधून येणाऱ्या दुसऱ्या एका मोठ्या ट्रकने या पिकअपला जोरदार धडक दिली. दोन ट्रकांच्या मध्यभागी चिरडल्या गेल्यामुळे पिकअप व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यातील प्रवासी महामार्गावर फेकले गेले. या दुहेरी अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि बचाव पथकाने तातडीने धाव घेत मदतकार्य सुरु केले.

Indonesia Road Accident Java Island
China Fire Accident: चीनमध्ये मोठी दुर्घटना, दुकानांच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू

या अपघातातील (Accident) जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सध्या या अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत. इंडोनेशियामध्ये ओव्हरलोड वाहने, रस्ते सुरक्षेच्या पुरेशा उपायांचा अभाव आणि वाहतूक नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन यामुळे असे जीवघेणे अपघात वारंवार घडत असल्याचे समोर आले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि पीडित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com