Report: 2027 चा वर्ल्ड कपच नाही, तर 2028 च्या ऑलिम्पिकमध्येही गौतम गंभीरच असणार टीम इंडियाचा 'बॉस'! बीसीसीआय देणार मुदतवाढ?

Gautam Gambhir Team India Coach Contract Extension: गौतम गंभीर केवळ 2027च्या वनडे विश्वचषकापर्यंतच नव्हे, तर त्यानंतरही भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहू शकतात आणि ते आपला कार्यकाळ आणखी काही महिन्यांसाठी वाढवण्यास उत्सुक आहेत.
Gautam Gambhir Team India Coach Contract Extension
Gautam GambhirDainik Gomantak
Published on
Updated on

Gautam Gambhir Team India Coach Contract Extension: टीम इंडियाला नुकतेच इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या खराब कामगिरीनंतर सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी भारतीय संघ व्यवस्थापन आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. गंभीरला पदावरुन हटवले जाईल अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, समोर आलेल्या एका ताज्या रिपोर्टनुसार, गौतम गंभीर केवळ 2027च्या वनडे विश्वचषकापर्यंतच नव्हे, तर त्यानंतरही टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहू शकतो आणि तो आपला कार्यकाळ आणखी काही महिन्यांसाठी वाढवण्यास उत्सुक आहे.

'एबीपी न्यूज'च्या रिपोर्टनुसार, गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) मुख्य लक्ष्य 2028 मध्ये लॉस एंजेलिस (LA) येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांवर आहे. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यामुळे गंभीरला टीम इंडियाला या ऐतिहासिक स्पर्धेसाठी तयार करायचे असून, टीम इंडियाला सुवर्णपदक जिंकवून देणे हे त्याचे अंतिम ध्येय आहे. गंभीरचा सध्याचा करार 2027च्या वनडे विश्वचषकापर्यंत आहे, त्यामुळे ऑलिम्पिकपर्यंत संघासोबत राहण्यासाठी त्याला बीसीसीआयकडून एक वर्षाची मुदतवाढ घ्यावी लागेल.

Gautam Gambhir Team India Coach Contract Extension
Team India: गौतम गंभीरला 'इग्नोर' करत आहेत सीनियर खेळाडू? ड्रेसिंग रूममध्ये धुसफूस, 'BCCI'पर्यंत पोहोचली नाराजी

गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी-20 विश्वचषक 2026 या मोठ्या स्पर्धांची विजेतेपदे पटकावली आहेत, तसेच संघाने आशिया चषकही जिंकला आहे. त्यामुळे त्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड अत्यंत उत्कृष्ट राहिला आहे.

Gautam Gambhir Team India Coach Contract Extension
Team India New Coach: टीम इंडियाला मिळणार नवा कोच, इंग्लंडचा 'हा' दिग्गज सांभाळणार जबाबदारी

बीसीसीआय गंभीरच्या कामगिरीचे मूल्यमापन त्याने जिंकलेल्या आयसीसी ट्रॉफीच्या आधारे करणार आहे. जर टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वाखाली आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा किंवा 2027चा वनडे वर्ल्ड कप जिंकला, तर त्याचा कार्यकाळ वाढवणे बीसीसीआयसाठी सोपे होईल. 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत.

Gautam Gambhir Team India Coach Contract Extension
Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

टीम इंडियाला जर या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवायचा असेल, तर त्यांना डिसेंबर 2026 पर्यंत आशिया खंडातील अव्वल (टॉप) संघ म्हणून आपले स्थान कायम ठेवावे लागेल. जर टीम इंडिया यात अपयशी ठरली, तर त्यांना ऑलिम्पिकसाठी पात्रता फेरी (क्वालिफायर्स) खेळावी लागेल. त्यामुळे टीम इंडियाचे ऑलिम्पिकमधील भविष्य हे पूर्णपणे आयसीसीच्या टी-20 रँकिंगवर अवलंबून असून गंभीर सध्या त्याच रणनीतीवर काम करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com