

Mars Saturn Labh Drishti Yog July 2026: ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या गोचर आणि दृष्टी परिवर्तनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच आकाशमंडळात एक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग निर्माण होणार आहे. येत्या रविवार (19 जुलै) रात्री 11 वाजून 37 मिनिटांनी शनी आणि मंगळ देवाचा 'लाभ दृष्टि योग' तयार होत आहे. या विशेष काळात हे दोन्ही बलाढ्य ग्रह एकमेकांपासून तंतोतंत 60 अंशाच्या कोनावर उपस्थित असतील.
ज्योतिषीय गणितांनुसार, या शुभ योगाचा सकारात्मक प्रभाव सर्व राशींवर कमी-अधिक प्रमाणात पडणार असला, तरी मेष, वृश्चिक, मकर आणि कुंभ या चार राशींच्या जातकांसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरणार आहे. या योगामुळे त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत.
मेष राशीच्या जातकांसाठी शनी-मंगळाचा हा लाभ दृष्टी योग अत्यंत फलदायी आणि शुभ सिद्ध होणार आहे. विशेषतः या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. करिअरच्या (Career) दृष्टीने हा काळ प्रगतीचा असून, नोकरी आणि व्यवसायात गुंतलेल्या लोकांना मोठा आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचे मन संपूर्ण काळ प्रसन्न राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांवरही या शुभ योगाची विशेष कृपा बरसणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा कमालीची मजबूत होईल. गेल्या अनेक दिवसांपासून चाललेला मानसिक तणाव पूर्णपणे दूर होईल आणि तुमच्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी सर्व बाजूंनी अनुकूल राहील.
मकर राशीच्या लोकांसाठी हा लाभ दृष्टी योग नाविन्यपूर्ण संधी घेऊन येत आहे. विशेषतः या राशीच्या व्यापाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. व्यवसायात एखादी मोठी आणि महत्त्वाची डील फायनल झाल्यामुळे तुम्हाला अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. याशिवाय, तुमची बऱ्याच काळापासून रेंगाळलेली किंवा अडकलेली कामे या काळात यशस्वीरीत्या पूर्ण होतील.
कुंभ राशीच्या जातकांसाठी देखील हा योग अत्यंत शुभ परिणाम देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे मोलाचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुमची कामगिरी सुधारेल. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात गेल्या काही काळापासून चाललेल्या सर्व प्रकारच्या अडचणी आणि संकटांचा आता कायमचा अंत होणार आहे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.