

Iranian Newspaper Threatens Donald Trump Sudden Death: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि खंदे समर्थक मानले जाणारे अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यांच्या या अकस्मात निधनानंतर अमेरिकेत खळबळ उडाली असतानाच, दुसरीकडे इराणमधील सरकारी आणि मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रांनी थेट या मृत्यूचा जश्न साजरा करण्यास सुरुवात केली. इराणचे प्रसिद्ध वृत्तपत्र 'हमशहरी'ने तर आपल्या मुख्य बातमीच्या मथळ्यात थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा दिला असून, त्यांचाही असाच "अचानक मृत्यू" होऊ शकतो, अशी थेट धमकी दिली.
या वृत्तपत्राने आपल्या पहिल्या पानावर एक वादग्रस्त छायाचित्रही प्रसिद्ध केले, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे लिंडसे ग्रॅहम यांच्या छायाचित्राजवळ गुडघ्यावर बसलेले दिसत आहेत. या छायाचित्रात अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इतर अनेक वरिष्ठ अमेरिकन व इस्रायली अधिकारी देखील दिसत असून, वर 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा' अशी अत्यंत प्रक्षोभक हेडलाईन देण्यात आली.
यासोबतच, इराणमधील इतर वृत्तपत्रांनीही ग्रॅहम यांच्या मृत्यूचे वृत्त अत्यंत आक्रमकपणे छापले. 'वतन-ए-एमरोज' या इराणी वृत्तपत्राने 13 जुलै रोजी आपल्या पहिल्या पानावर "मौत के सौदागर की मौत" अशा मथळ्याखाली ही बातमी प्रसिद्ध केली. केवळ वृत्तपत्रेच नव्हे, तर इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवरील एका वृत्त निवेदकाने थेट इराणच्या जनतेचे अभिनंदन करत, "इराणविरोधी आणि युद्ध भडकवणारे अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांना नरकात पाठवले गेले," असे जाहीर वक्तव्य केले.
इराणच्या या अधिकृत वक्तव्यांमुळे आणि प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमुळे अमेरिकेत, विशेषतः ट्रम्प यांच्या समर्थकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी ग्रॅहम यांच्या मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी केली असून, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) ग्रॅहम यांना यापूर्वी दिलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांचा हवाला दिला.
इराणमध्ये लिंडसे ग्रॅहम यांच्या मृत्यूचा इतका मोठा जश्न साजरा होण्यामागे त्यांचा भूतकाळातील राजकीय इतिहास आहे. साऊथ कॅरोलिनाचे सिनेटर असलेले ग्रॅहम हे कट्टर इराणविरोधी नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला सातत्याने लष्करी मदत देण्याचे समर्थन केले होते, तसेच गाझा संघर्षात इस्रायलची बाजू खंबीरपणे लावून धरली होती. इराणमधील सध्याची राजवट उलथवून टाकली पाहिजे, असा युक्तिवाद त्यांनी वारंवार केला होता. गाझामध्ये इस्रायलने अण्वस्त्रांचा वापर करणे योग्य ठरु शकते, असे वादग्रस्त विधान करुन त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाद ओढवून घेतला होता. तसेच 28 फेब्रुवारी रोजी इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी उघडपणे इराणी सरकार पाडण्याची मागणी केली होती, यामुळेच ते इराणच्या रडारवर होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.