Shardiya Navratri 2025: लवकरच नवरात्रीचा उत्सव सुरु होणार असून देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या या दिव्य अनुष्ठानामध्ये घटस्थापना (कलश स्थापना) चे विशेष महत्त्व आहे. घटस्थापना हे दुर्गा पूजेच्या आरंभाचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच याला ‘शांती कलश’ असेही म्हटले जाते. यंदा 22 सप्टेंबर रोजी नवरात्रीला सुरुवात होत असून हा दिवस सोमवार आहे आणि या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत.
घटस्थापनेच्या माध्यमातून संपूर्ण विश्वातील शुभ आणि पवित्र शक्तींना कलशामध्ये आमंत्रित केले जाते. कलशामध्ये सात समुद्रांचे पाणी, सर्व नद्यांचे जल आणि देवी-देवतांचे तसेच दिक्पालांचे आवाहन केले जाते. या सर्व शक्तींचा निवास कलशामध्ये झाल्यावर, कलश हे विघ्नहर्ता गणेशाचे रुप धारण करतो, असे मानले जाते. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने संपूर्ण पूजा निर्विघ्नपणे पार पडते. यामुळेच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी कलशाची स्थापना करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
यंदा 22 सप्टेंबर रोजी सोमवारी नवरात्रीचा आरंभ होत आहे. या दिवशी सूर्योदयापासूनच आश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी सुरु होईल. सोबतच, दुपारी 11 वाजून 24 मिनिटांपर्यंत उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा योग असून, त्यानंतर हस्त नक्षत्र सुरु होईल. मात्र, याच दिवशी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांपासून सकाळी 9 वाजेपर्यंत राहूकाळ असणार आहे. धार्मिक कार्यासाठी हा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे शक्यतो राहूकाळ टाळूनच घटस्थापना करणे अधिक शुभ ठरेल.
धार्मिक शास्त्रानुसार, गृहस्थांनी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांपूर्वी किंवा 9 वाजल्यानंतर घटस्थापना करावी. तर, सार्वजनिक दुर्गा पूजा मंडळांसाठी अभिजीत मुहूर्तावर घटस्थापना करणे अत्यंत शुभ मानले जाते.
दिल्ली: सकाळी 06:13 ते 07:29 या वेळेत. त्यानंतर अभिजीत मुहूर्त सकाळी 11:49 ते दुपारी 12:38 पर्यंत.
मुंबई: सकाळी 06:31 ते 07:20 या वेळेत. त्यानंतर अभिजीत मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:55 पर्यंत.
कोलकाता: सकाळी 05:28 ते 07:16 या वेळेत. त्यानंतर अभिजीत मुहूर्त सकाळी 11:05 ते 11:53 पर्यंत.
चेन्नई: सकाळी 06:01 ते 07:22 या वेळेत. त्यानंतर अभिजीत मुहूर्त सकाळी 11:37 ते दुपारी 12:26 पर्यंत.
जम्मू: सकाळी 06:23 ते 08:19 या वेळेत. त्यानंतर अभिजीत मुहूर्त सकाळी 11:59 ते दुपारी 12:47 पर्यंत.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करा.
पूजास्थळी लाल रंगाच्या आसनावर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा. हातामध्ये कुश (एक प्रकारचे गवत) घ्या आणि हातातील जल पूजास्थळ व पूजेच्या साहित्यावर शिंपडून शुद्ध करा. यावेळी "ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा। यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः।।" या मंत्राचा जप करा.
कपाळावर चंदनाचा टिळक लावून "चंदनस्य महतपुण्यं पवित्रं पाप नाशनम। आपदं हरति नित्यं लक्ष्मी तिष्ठति सर्वदा।।" या मंत्राचा उच्चार करा.
घटस्थापना करण्यासाठी सप्तमृतिका (सात प्रकारच्या माती) वाळूमध्ये मिसळून वर्तुळाकार पसरवा. त्यानंतर त्या जागेच्या मध्यभागी कलश स्थापित करा.
5. कलश स्थापित करण्यापूर्वी त्यावर स्वस्तिकाचे चिन्ह काढा. कलशाचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा.
6. कलशासाठी माती पसरवताना "ओम भूरसि भूमिरस्यदितिरसि विश्वधाया विश्वस्य भुवनस्य धर्त्रीं। पृथिवीं यच्छ पृथिवीं दृग्वंग ह पृथिवीं मा हि ग्वंग सीः।।" या मंत्राचा जप करा.
7. त्यानंतर कलशाच्या खालील मातीमध्ये जव (बार्ली) मिसळा आणि "ओम धान्यमसि धिनुहि देवान् प्राणाय त्यो दानाय त्वा व्यानाय त्वा। दीर्घामनु प्रसितिमायुषे धां देवो वः सविता हिरण्यपाणिः प्रति गृभ्णात्वच्छिद्रेण पाणिना चक्षुषे त्वा महीनां पयोऽसि।।" या मंत्राचा जप करा.
8. मंत्रोच्चारण करत कलशावर फुले अर्पण करा. त्यासाठी "ओम आ जिघ्र कलशं मह्या त्वा विशन्त्विन्दव:। पुनरूर्जा नि वर्तस्व सा नः सहस्रं धुक्ष्वोरुधारा पयस्वती पुनर्मा विशतादयिः।।" या मंत्राचा जप करा.
9. त्यानंतर कलशामध्ये जल भरा. जल भरताना "ओम वरुणस्योत्तम्भनमसि वरुणस्य स्काभसर्जनी स्थो वरुणस्य ऋतसदन्यसि वरुणस्य ऋतसदनमसि वरुणस्य ऋतसदनमा सीद।।" हा मंत्र म्हणा.
10. कलशावर चंदनाचा टिळक लावण्यासाठी "ओम त्वां गन्धर्वा अखनस्त्वामिन्द्रस्त्वां बृहस्पतिः। त्वामोषधे सोमो राजा विद्वान् यक्ष्मादमुच्यत।।" या मंत्राचा जप करा
11.कलशातील जल प्रभावी करण्यासाठी त्यात सर्वोषधी टाका. सर्वोषधी टाकताना "ओम या ओषधी: पूर्वाजातादेवेभ्यस्त्रियुगंपुरा। मनै नु बभ्रूणामह ग्वंग शतं धामानि सप्त च।।" या मंत्राचा जप करा.
12. कलशावर आंब्याच्या किंवा अशोकाच्या झाडाचे पंच पल्लव (पाच पाने) ठेवा आणि "ओम अश्वस्थे वो निषदनं पर्णे वो वसतिष्कृता।। गोभाज इत्किलासथ यत्सनवथ पूरुषम्।।" या मंत्राचा जप करा.
13. कलशामध्ये सात प्रकारची माती (सप्तमृतिका) टाका आणि "ओम स्योना पृथिवि नो भवानृक्षरा निवेशनी। यच्छा नः शर्म सप्रथाः।" हा मंत्र बोला.
14. त्यानंतर कलशामध्ये एक सुपारी टाका आणि "ओम याः फलिनीर्या अफला अपुष्पायाश्च पुष्पिणीः। बृहस्पतिप्रसूतास्ता नो मुञ्चन्त्व ग्वंग हसः।।" हा मंत्र म्हणा.
15. कलशामध्ये नाणे (सिक्का) टाका आणि "ओम हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत्। स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय हविषा विधेम।।" हा मंत्र उच्चारा.
16. कलशावर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र अर्पण करा. यासाठी "वासो अग्ने विश्वरुप ग्वंग सं व्ययस्व विभावसो।।" हा मंत्र आहे.
17. कलशामध्ये थोडे अक्षत (अखंड तांदूळ) टाका. अक्षत टाकताना "वस्नेव विक्रीणावहा इषमूर्ज ग्वंग शतक्रतो।।" या मंत्राचा जप करा.
19. सर्वात शेवटी, नारळावर एक वस्त्र गुंडाळून तो कलशावर स्थापित करा. यासाठी "ओम याः फलिनीर्या अफला अपुष्पा याश्च पुष्पिणीः। बृहस्पतिप्रसूतास्ता नो मुञ्चन्त्व हसः।।" हा मंत्र पुन्हा म्हणा.
या विधीनुसार घटस्थापना केल्यास देवीची कृपा आपल्यावर सदैव राहील, अशी श्रद्धा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.