Navratri in Goa: गोव्यात नवरात्रौत्सवाची दणक्यात सुरुवात; विविध कार्यक्रमांचे आयोजन

Navratri Celebration in Goa: गावागावांमध्ये स्थानिकांच्या मनोरंजनासाठी नाटकं, स्पर्धा किंवा इतर कार्यक्रमांचं आयोजन
Navratri Celebration in Goa: गावागावांमध्ये स्थानिकांच्या मनोरंजनासाठी नाटकं, स्पर्धा किंवा इतर कार्यक्रमांचं आयोजन
Navratri Celebration in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याच्या विविध भागांमध्ये आजपासून नवरात्रौत्सव सुरु झाला आहे. नवरात्र म्हटलं की गोव्यात मखरांचा उत्सव हा प्रामुख्याने साजरा केला जातो मात्र विविध ठिकाणी भजन-कीर्तनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. गावागावांमध्ये असेलेल्या छोट्याश्या मंदिरांमध्ये देखील स्थानिकांच्या मनोरंजनासाठी नाटकं, स्पर्धा किंवा इतर कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

आज गोव्यात अनेक ठिकाणी घटस्थापना करण्यात आली आणि देवीच्या नऊ दिवसाच्या उत्सवाची सुरुवात झाली. डिचोलीतील प्रसिद्ध शांतादुर्गेच्या मंदिरात नऊ दिवस कार्यक्रम होणार आहे, तसेच भाविक इथे रात्री कीर्तनाचा देखील आस्वाद घेऊ शकतात, मंदिरात पंचमी ते नवमी पर्यंत मखरोत्सव होणार आहे आणि शेवटच्या दिवशी पावणीने या उत्सवाची सांगता होईल अशी माहिती शांतादुर्गा देवस्थानाचे सचिव शामू गावकर यांनी दिली.

Navratri Celebration in Goa: गावागावांमध्ये स्थानिकांच्या मनोरंजनासाठी नाटकं, स्पर्धा किंवा इतर कार्यक्रमांचं आयोजन
St. Francis Xavier: "गोयच्या सायबाबद्दल हे ऐकून भावना दुखावल्या की नाही?" वेलिंगकरांच्या वक्तव्यावर सरदेसाई भडकले, मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न!

पार्शात देखील भाविकांकडून वाजतगाजत देवीच्या मूर्तीचे आगमन झाले असून येत्या नऊ दिवसांसाठी इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात दांडिया तर असेलच मात्र सोबत लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय केपे, वाळपई,मोरजी या ठिकाणी देखील नवरात्राच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com