Rahu Ketu Gochar 2026 Dainik Gomantak
Horoscope

Rahu Ketu Gochar 2026: धनलाभ आणि प्रगतीचा योग! राहु-केतुच्या गोचरने 'या' 3 राशींचे चमकणार नशीब; आर्थिक स्थिती होणार भक्कम

Rahu Ketu Transit November 25 Lucky Zodiac Signs: आज 26 नोव्हेंबर रोजी दोन महत्त्वाच्या ग्रहांची- राहु आणि केतु यांची राशी बदलत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 'छाया ग्रह' म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही ग्रह नेहमी वक्री म्हणजेच उलटी चाल चालतात.

Manish Jadhav

Rahu Ketu Gochar 2026: आज 26 नोव्हेंबर रोजी दोन महत्त्वाच्या ग्रहांची- राहु आणि केतु यांची राशी बदलत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 'छाया ग्रह' म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही ग्रह नेहमी वक्री म्हणजेच उलटी चाल चालतात. या गोचरचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल, परंतु मेष, मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील.

राहु ग्रहाचा राशी बदल संध्याकाळी 4 वाजून 34 मिनिटांनी होणार आहे. यावेळी राहु कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. त्याचवेळी केतु ग्रह सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा मेष, मिथुन आणि कन्या राशीला फायदा होईल.

मेष राशी: राहु-केतुचा गोचर मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मकता आणि आनंदाची लाट घेऊन येईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवू शकाल, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट आणि सुखद होईल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि कौतुक होईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्न वाढेल.

मिथुन राशी: या राशीच्या लोकांना आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती पाहायला मिळेल. तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी (Investment) हा काळ अत्यंत अनुकूल असून, भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो. या गोचरमुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी वाढेल आणि आर्थिक स्थैर्य येईल.

कन्या राशी: राहु-केतुचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी करिअरच्या बाबतीत खूप फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याचे योग आहेत. आर्थिक प्रगती होईल आणि संपत्तीत वाढ होईल. जे लोक नवीन नोकरी शोधत आहेत, त्यांना या काळात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Constitution: संविधान दिनाच्या दिवशीच लोकशाहीसमोर प्रश्न; संविधानाची फसवणूक तर होत नाही ना?

Indian Constitution Day: 'संविधान हीच आमची शक्ती'; 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचे मोदींचे आवाहन

Road Accident: 2 चिमुकल्या विद्यार्थिनींना अखेरचा निरोप; साकोर्डा अपघातानंतर 'साकवाला कठडे असते तर...'ची चर्चा

Haryana Gang War: पोलिस चौकीपासून 50 पावलांवर रक्तरंजित थरार! जेवणाच्या टेबलावरच तीघांचा मृत्यू, एकाचा पाठलाग करुन झाडल्या गोळ्या; रोहतक हादरले

Bayangini Waste Management Project: 140 कोटींचा प्रकल्प कागदावरच; बायंगिणीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आणखी 6 महिन्यांचा विलंब?

SCROLL FOR NEXT