Navpancham Rajyoga: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन आणि त्यांच्यातील परस्पर युती मानवी जीवनावर तसेच देश-दुनियेवर परिणाम करत असते. ग्रहांच्या हालचालीतून निर्माण होणारे काही योग हे अत्यंत शुभ मानले जातात आणि असाच एक दुर्मिळ संयोग मार्च महिन्यात जुळून येत आहे. ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा 'बुध' आणि कर्मफळ दाता 'शनी देव' मिळून 'नवपंचम राजयोग' निर्माण करणार आहेत.
विशेष म्हणजे, 7 मार्च रोजी शनी देव मीन राशीमध्ये उदय होणार आहेत आणि याच काळात शनी व बुध यांच्या संयोगातून हा भव्य राजयोग होणार आहे. जवळपास 30 वर्षांनंतर हा योग जुळून येत असल्याने ज्योतिष क्षेत्रात याला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, यामुळे काही राशींच्या आयुष्यात भाग्योदय होणार आहे.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअर आणि व्यवसायात मोठी झेप घेणारा ठरणार आहे. जे तरुण बऱ्याच काळापासून रोजगाराच्या शोधात आहेत, त्यांना चांगल्या नोकरीची संधी चालून येऊ शकते. तुमची अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे आता मार्गी लागतील, ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल. तसेच, नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची शाबासकी मिळण्यासोबतच पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत आहेत. व्यापाऱ्यांसाठी हा काळ व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अत्यंत अनुकूल असून, आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होईल. या राजयोगाच्या प्रभावामुळे तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे कौटुंबिक आनंद द्विगुणित होईल.
कर्क राशीच्या जातकांसाठी नवपंचम राजयोग नशिबाची भक्कम साथ घेऊन येत आहे. तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होऊन कामाला गती मिळेल. आर्थिक आघाडीवर हा काळ प्रगतीचा असून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे तुमची बचत वाढण्यास मदत होईल. नोकरी आणि व्यापार या दोन्ही क्षेत्रांत तुमची प्रगती होईल आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांतता नांदेल आणि नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. याच काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता असून व्यवसायानिमित्त केलेल्या लहान किंवा मोठ्या प्रवासातून फायदा होऊ शकतो. तुम्ही आखलेल्या योजनांना या काळात यश मिळेल, फक्त निर्णयांमध्ये थोडा संयम बाळगणे हिताचे ठरेल.
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा राजयोग सकारात्मक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. तुमच्या कार्यपद्धतीत सुधारणा होईल आणि लोक तुमच्या क्षमतेची दखल घेऊ लागतील. करिअर आणि सामाजिक आयुष्यात तुम्हाला प्रगती पाहण्यास मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ शुभ असून धनसंपत्तीत वाढ होईल. नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या कर्तृत्वाला नवी ओळख मिळेल. व्यापाऱ्यांसाठी नवीन करार फायदेशीर ठरतील. जर तुम्हाला एखादे नवीन काम सुरु करायचे असेल किंवा आयुष्यात मोठा निर्णय घ्यायचा असेल, तर या राजयोगाचा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायी सिद्ध होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.