Horoscope Today April 24, 2026 Dainik Gomantak
Horoscope

Horoscope Today: बगलामुखी जयंती आणि दुर्गाष्टमीचा अद्भूत संयोग; 'या' राशींवर होणार देवीची अलोट कृपा, रखडलेली कामे मार्गी लागणार

Horoscope Today April 24, 2026: वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी ही अध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

गोमंतक ऑनलाईन टीम

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी ही अध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. २४ एप्रिल २०२६ रोजी शुक्रवारी हा खास दिवस असून, या दिवशी श्री बगलामुखी जयंती आणि दुर्गाष्टमीचा महासंयोग जुळून येत आहे. ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार, या दिवशी पुष्य नक्षत्र रात्री ८:१५ पर्यंत राहणार असून, सायंकाळी ७:२२ पर्यंत अष्टमी तिथी असेल. या मंगलमयी दिनी ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे अनेक राशींच्या व्यक्तींना प्रगतीच्या नव्या संधी आणि आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

मेष आणि वृषभ: व्यापारात सावधानता पण फायद्याचे संकेत मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा ठरेल. व्यावसायिक स्पर्धेपासून दूर राहून आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित करणे हिताचे राहील. दुसरीकडे, वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस आनंदाचा असेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असून, सकारात्मक विचारांच्या लोकांच्या सहवासामुळे करिअरला नवी दिशा मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवणे या राशींसाठी आवश्यक आहे.

मिथुन, कर्क आणि सिंह: आत्मविश्वास आणि यश प्राप्ती मिथुन राशीच्या व्यक्तींना आज एखादी आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावेल. मालमत्तेचे रखडलेले प्रश्न मार्गी लागतील. कर्क राशीच्या लोकांसाठी घरगुती खरेदी आणि नातेवाईकांच्या भेटीगाठींचे योग आहेत. सिंह राशीच्या व्यक्तींनी मात्र अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे टाळावे, तरीही त्यांचे वैवाहिक जीवन सुखमय राहील आणि करिअरमध्ये विद्यार्थी प्रगती करतील.

कन्या, तुळ आणि वृश्चिक: मेहनतीचे फळ आणि नवीन योजना कन्या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस शिस्तीचा आहे. कामात नियोजन केल्यास मोठे यश मिळू शकते. तुश राशीसाठी परिस्थिती पूर्णपणे अनुकूल असून, मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची हीच वेळ आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जोडीदारासोबत नवीन घर घेण्याचे नियोजन या दिवशी यशस्वी होऊ शकते.

धनु, मकर, कुंभ आणि मीन: जीवनशैलीत बदल आणि प्रगती धनु राशीचे लोक आपल्या दिनचर्येत सकारात्मक बदल करतील, ज्यामुळे त्यांना नवी ऊर्जा मिळेल. मकर राशीच्या व्यक्ती जुन्या चुकांतून बोध घेत नवी सुरुवात करतील. कुंभ राशीसाठी आजचा दिवस आर्थिक मजबूतीचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT