Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: सुवर्णयोग! वृषभ, मिथुनसह 5 राशींना प्रचंड आर्थिक लाभ आणि यश; मेष आणि कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टी टाळा

Horoscope 30 October 2025: आज कार्तिक शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून गुरुवारचा दिवस आहे. अष्टमी तिथी सकाळी १०:०७ वाजेपर्यंत राहील.

Sameer Amunekar

आज कार्तिक शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून गुरुवारचा दिवस आहे. अष्टमी तिथी सकाळी १०:०७ वाजेपर्यंत राहील, त्यानंतर नवमी तिथी लागेल. सायंकाळी ६:३४ पासून उद्या सकाळी ६:०८ वाजेपर्यंत यायिजय योग राहील. तसेच आज संध्याकाळी ६:३४ पर्यंत श्रवण नक्षत्र असेल. आज दुर्गाष्टमीचे व्रत पाळले जाईल. जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य.

मेष: आज संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. कामात घाई करू नका, अन्यथा चुका होतील. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाऐवजी मोबाईलकडे राहू शकते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात यश मिळवण्यासाठी नवे विचार सुचतील. योग्य दिशेने केलेला प्रयत्न यशस्वी ठरेल. नोकरीत मोठी खुशखबरी मिळण्याची शक्यता.

वृषभ: पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा आज फायदा मिळेल. आज मित्राला मदत कराल. व्यापारात सकारात्मक बदल दिसतील. आरोग्य सुधारेल. मेहनतीने अवघड काम पूर्ण होईल. संध्याकाळी जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवाल. तुमचा आनंदी स्वभाव सर्वांना प्रभावित करेल.

मिथुन: आज वडिलधाऱ्यांचा आशिर्वाद तुमच्यासोबत राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल. जीवनसाथीच्या भावना समजून घ्याल. लेखन, पत्रकारिता किंवा कला क्षेत्रातील लोकांना चांगली संधी मिळू शकते.

कर्क: आज दिवस सामान्य राहील. बचतीतील काही रक्कम वापरावी लागेल. मुलांना काही चांगले शिकवण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती होईल. वेळ वाया घालवू नका.

सिंह: आज नशीब तुमच्या बाजूने असेल. मित्राची भेट फायद्याची ठरेल. कुटुंबात प्रेम व सौहार्द वाढेल. वडिलांचे सहकार्य लाभेल. महिलांसाठी आजचा दिवस सुखकारक राहील.

कन्या: विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रवासाची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना नफा मिळेल. आरोग्य सुधारेल. नवविवाहितांना कुटुंबाकडून आनंद मिळेल. घरात हसरे वातावरण राहील.

तुळ: सोशल मीडियावर नवीन ओळखी होतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. मित्रांसोबत नवीन व्यवसायाची योजना आखाल. मार्केटिंग आणि सेल्स क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवे क्लायंट मिळतील. आर्थिक वाढ होईल.

वृश्चिक: आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. विद्यार्थ्यांना करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. जोडीदारासोबत सहलीचा प्लॅन बनवाल. मुलांमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. समाजकार्यात सहभाग घ्याल.

धनु: घरातील प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुमच्या मतांना लोक मान्यता देतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगला प्रस्ताव येईल. आर्थिक स्थैर्य राहील. महिलांच्या ऑनलाईन व्यवसायात नफा वाढेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

मकर: कामात थोडा विलंब होईल पण प्रयत्न फलदायी ठरतील. कुटुंबाचा सहकार्य मिळेल. जोडीदारावर विश्वास ठेवल्यास नात्यात गोडवा राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आर्थिक लाभाचे नवे स्रोत दिसतील.

कुंभ: रागावर नियंत्रण ठेवा. जुन्या मित्रांशी संवाद साधून जुन्या आठवणींना उजाळा द्याल. विद्यार्थ्यांना सहपाठकांची मदत मिळेल. व्यवसाय स्थिर राहील. इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सर्जनशील संधी मिळेल.

मीन: विद्यार्थ्यांना आज काही नवीन शिकण्याची संधी मिळेल. गुरूंचे मार्गदर्शन लाभेल. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. वकिलांना नवीन केस मिळेल. व्यापारात नफा मिळेल. भाऊ–बहिणींचे संबंध दृढ होतील. वाणीवर संयम ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'CM सावंत राजीनामा द्या!', हडफडे दुर्घटनेनंतर काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला; सत्तेत राहण्याचा अधिकार नाही म्हणत दिला अल्टिमेटम

Goa Ritual Theatre: जेव्हा भक्ताच्या अंगात ‘भार’ येतो, तेव्हा तो सामान्य माणूस न राहता देवतेचे रूप घेतो, हेच मूळ 'विधीनाट्य'

Pooja Naik: 'पूजा नाईक'सारख्या व्यक्तीकडे 8 कोटी रुपये सापडतात, याचा अर्थ काय?

Goa Live News: हडफडे दुर्घटनेवर बोलताना आमदार मायकल लोबो भावूक; डोळ्यात आले अश्रू

Mangroves Goa: हुपळी 'खारफुटी'चे झाड म्हणजे एकेकाळी लोकदैवताचे नैसर्गिक मंदिर ठरले होते..

SCROLL FOR NEXT