Shetkari Aadhar Nidhi Scheme: पावसानं झोडपलं, सरकारनं सावरलं, 'डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर 40 हजार भरपाई देणार'; CM सावंतांची मोठी घोषणा

Shetkari Aadhar Nidhi Scheme Goa: या संकटाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत जाहीर केली आहे
Goa agriculture scheme
Goa agriculture schemeDainik Gomantak
Published on
Updated on

Shetkari Aadhar Nidhi farmer compensation Goa: राज्यात ऐन भात काढणीच्या हंगामात कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतात उभे असलेले आणि कापणीसाठी तयार असलेले भात पीक राज्यभर खराब झाल्याच्या घटना समोर येत आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत जाहीर केली आहे.

'शेतकरी आधार निधी' अंतर्गत भरीव भरपाई

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी (दि. २९) रोजी त्यांच्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून ही महत्त्वाची घोषणा केली. पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर ४०,००० इतकी भरपाई देण्यात येणार आहे. ही भरपाई 'राज्य शेतकरी आधार निधी योजना' अंतर्गत दिली जाईल.

या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चार हेक्टरपर्यंत मदत मिळू शकते, म्हणजेच १.६० लाख इतकी कमाल रक्कम मिळेल. नुकसान भरपाईची रक्कम डिसेंबर २०२५ पर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, जेणेकरून त्यांना पुढील हंगामाची तयारी करता येईल.

दिवंगत मंत्री रावी नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे नुकताच कृषी विभागाचा कार्यभार आला आणि त्यांनतर त्यांनी ही मदत त्वरित जाहीर करून शेतकऱ्यांबद्दलची संवेदनशीलता दाखवली.

Goa agriculture scheme
Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

नुकसानीचा सर्वेक्षणा तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

एका बाजूला सरकारने मदतीची घोषणा केली असली, तरी दुसरीकडे कृषी विभाग नुकसानीचे मूल्यांकन लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या कामाला लागला आहे. कृषी संचालक संदीप फोळ देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व विभागांमधील कृषी अधिकाऱ्यांना नुकत्याच झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सोमवारपासूनच विभागीय कृषी अधिकारी आणि त्यांच्या टीम्स प्रभावित भागांमध्ये जाऊन नुकसानीचे मूल्यांकन करत आहेत आणि त्यांनतर येत्या एक ते दोन आठवड्यांत हे संपूर्ण मूल्यांकन पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर, त्याची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना त्वरित आधार निधी वितरित करण्यावर शासनाचा भर असेल. या भरपाईमुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान भरून निघणार नसले तरी, त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास आणि पुढील लागवडीसाठी सज्ज होण्यास निश्चितच मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com