Andha Salim Arrested: खून, खंडणी, दरोडा, घरफोड्या करणाऱ्या 'अंधा सलीम'ला अटक; गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकात गुन्हे

Belagavi Police Successfully Arrested Andha Salim: गोवा, बेळगाव आणि महाराष्ट्रात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी अखेर यश आले.
Belagavi Police Successfully Arrested Andha Salim
Andha Salim ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

Belagavi Police Action: गोवा, बेळगाव आणि महाराष्ट्रात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी अखेर यश आले. बेळगाव पोलिसांनी ही मोहीम राबवून या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या. अंधा सलीम उर्फ सलीम कमरुद्दीन सौदागर असे या गुन्हेगाराचे नाव आहे. खून, खंडणी आणि घरफोड्या अशा तब्बल 37 गुन्ह्यात त्याचा सहभाग होता.

अंधा सलीमला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दरम्यान, बेळगावातील बागवान गल्ली येथे अंधा सलीम वास्तव्यास होता. सलीमच्या गुन्हेगारीच्या आंतकाने पोलिस प्रशासनाला हादरवून सोडले होते. त्याच्यावर अंमली पदार्थाचे गुन्हे, धमकावणे, खंडणी अशा प्रकारचे 37 गुन्हे आधीच दाखल होते. विशेष म्हणजे, त्याला शिक्षा झालेल्या 5 गुन्ह्यातून तो सध्या जामीनावर होता. जामीनावर असतानाही त्याने न सुधारता खुनाचे गुन्हे सुरु ठेवून साक्षीदारांना धमकावण्याचे प्रकार सुरुच होते. हेच लक्षात घेऊन पोलिसांनी (Police) सलीम याला बेड्या ठोकल्या.

Belagavi Police Successfully Arrested Andha Salim
Karanataka Election: ऑन ड्यूटी 24 तास! गोवा, महाराष्ट्रातून येणाऱ्या अवैध मद्य, पैसा यावर कर्नाटकचे लक्ष

नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश

सलीमच्या अटकेनंतर बेळगाव पोलिसांनी त्याच्या गुन्ह्याचा रिपोर्ट संबंधी राज्य पोलिस प्राधीकरणाकडे तातडीने धाडला. या रिपोर्टची दखल घेऊन प्राधीकरणाने या सराईत गुन्हेगाराला नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले.

प्राधीकरणाच्या या आदेशानुसार, पोलिसांनी एनडीपीएस कायदा 1988 अंतर्गत सलीमच्या अटक वॉरंटसाठी सक्षम अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यानंतर तात्काळ सरकारच्या आदेशानुसार 27 ऑक्टोबर रोजी सलीम नजरकैदेत ठेवण्यासाठी वॉरंट जारी केले.

Belagavi Police Successfully Arrested Andha Salim
Illegal Fishing: 'ही' घुसखोरी नाही तर नियमांतील तफावत! कर्नाटकच्या मच्छिमारांनी मंत्री हळर्णकरांसमोर मांडली बाजू

बेळगाव आयुक्तालयाकडून झालेली ही कठोर आणि विशेष कायद्याखालील कारवाई गुन्हेगारी जगतासाठी एक स्पष्ट संदेश आहे की, गुन्हेगार जामिनावर बाहेर असले तरी, त्याची गुन्हेगारी थांबवण्यासाठी प्रशासन कठोर पाऊल उचलू शकते. यामुळे बेळगावसह सीमाभागात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com