मंत्रिपद नाही पण मायकल लोबोंना महामंडळ मिळाले; माजी उपमुख्यमंत्री कवळेकरांना कला अकादमीच्या अध्यक्षपदाची लॉटरी

Goa government latest news: यासह विविध महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी विविध नेत्यांकडे देण्यात आली आहे.
Michael Lobo Gets Corporation Post, Babu Kavlekar Named Art Academy Chairman | Goa Politics News
Michael Lobo, Chandrakant Kavlekar And Sankalp Amonkar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या (GSIDC) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  तर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांकडे कला अकादमीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गोविंद गावडे यांच्या गच्छंतीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी कला अकादमीचे अध्यक्षपद स्वत:कडे ठेवले होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळात फेरबदलात मायकल लोबो यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. दरम्यान, लोबो यांच्या ऐवजी रमेश तवडकर आणि दिगंबर कामत यांना मंत्रिपदी संधी देण्यात आली.

लोबोंची आता राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. यासह विविध महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी विविध नेत्यांकडे देण्यात आली आहे.

Michael Lobo Gets Corporation Post, Babu Kavlekar Named Art Academy Chairman | Goa Politics News
फोंड्यात उभा राहणार रवी नाईक यांचा पुतळा; पालिकेने घेतले तीन महत्वाचे निर्णय

कोणाकडे कोणते महामंडळ?

१) कुठ्ठाळीचे आमदार अंतानियो वाझ यांच्याकडे गोवा खादी आणि ग्रामीण औद्योगिक मंडळाच्या अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे.

२) गोवा शिक्षण विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी गोविंद पर्वतकर यांच्याकडे देण्यात आली आहे.

३) दयानंद सोपटे यांची बाल भवनच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

Michael Lobo Gets Corporation Post, Babu Kavlekar Named Art Academy Chairman | Goa Politics News
गोव्यातील सार्वजनिक सेवेतील वाहनांना GPS ट्रॅकिंग आणि पॅनिक बटन बसविण्याची सूचना, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

४) माजी आमदार चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्याकडे कला अकादमीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे लॉ कमिशनची जबाबदारी देण्यात आलीये.

५) दयानंद मांद्रेकर गोवा राज्य एसटी आणि ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील.

६) मायकल लोबो यांच्याकडे राज्य साधनसुविधा विकास महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, केदार नाईक गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राहतील. संकल्प आमोणकर सांडपाणी आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचे काम पाहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com