13 February 2026 Horoscope Dainik Gomantak
Horoscope

13 February 2026 Horoscope: विजया एकादशीचा शुभ मुहूर्त: 'या' राशींना बक्कळ पैसे मिळणार, प्रेमसंबंधही सुधारणार

Horoscope: आज फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून शुक्रवारी 'विजया एकादशी' साजरी केली जात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

आज फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून शुक्रवारी 'विजया एकादशी' साजरी केली जात आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण ग्रह-नक्षत्रांची स्थिती सर्व १२ राशींवर विशेष प्रभाव टाकत आहे. दुपारी २ वाजून २६ मिनिटांपर्यंत एकादशी तिथी असून, संध्याकाळी मूळ नक्षत्राचा प्रभाव राहील. या शुभ योगामुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाची उधळण होणार आहे, तर काहींना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मेष ते मिथुन: प्रगतीचा नवा मार्ग

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम असून रखडलेली कामे पूर्ण होतील. वृषभ राशीच्या जातकांना ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे, तर मिथुन राशीच्या व्यक्तींना आर्थिक बळकटी मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.

सिंह राशीला सतर्कतेचा इशारा

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र फळांचा आहे. व्यापारी गुंतागुंतीतून सुटका होत असली तरी, मुलांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नकारात्मक विचारांपासून दूर राहून संयमाने काम केल्यास मोठे नुकसान टाळता येईल. पोटाशी संबंधित विकार उद्भवण्याची शक्यता असल्याने डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.

मकर आणि धनु: आर्थिक भरभराट आणि आत्मविश्वास

धनु राशीच्या व्यक्तींना आज नवीन वाहन सुख मिळण्याचे योग आहेत. जोडीदाराच्या सहकार्यामुळे कामातील अडथळे दूर होतील. दुसरीकडे, मकर राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढलेला असेल. राजकारण्यांशी येणारे संबंध भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. या राशीच्या लोकांनी धावपळीच्या जीवनातून स्वतःसाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT