Goa ZP Election Dainik Gomantak
गोवा

ZP Election: रविवार ठरला प्रचाराचा वार, अखेरचे 4 दिवस रंगणार रणधुमाळी; भाजपकडून मुख्‍यमंत्री, दामू, विश्‍‍वजीत, तर 'आप'कडून केजरीवाल मैदानात

Goa ZP Election: २०२७ मध्‍ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असलेली जिल्‍हा पंचायत निवडणूक सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड, रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स (आरजीपी) यांनी प्रतिष्‍ठेची बनविली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍यात २०२७ मध्‍ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असलेली जिल्‍हा पंचायत निवडणूक सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड, रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स (आरजीपी) यांनी प्रतिष्‍ठेची बनविली आहे. प्रचारासाठी अवघे चार दिवस असल्‍याने मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍यासह सर्वच पक्षांचे प्रमुख नेते आपल्‍या पक्षाच्‍या उमेदवारांच्‍या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्‍यामुळे या चार दिवसांत राज्‍यभर प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी येत्‍या २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, २२ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून २२६ उमेदवार रिंगणात आहेत. त्‍यात उत्तर गोव्‍यातील १११ आणि दक्षिण गोव्‍यातील ११५ उमेदवारांचा समावेश आहे.

जिल्‍हा पंचायत निवडणूक ही पक्षाच्‍या चिन्‍हावर होत असल्‍याने भाजप, काँग्रेस, आप, मगो, गोवा फॉरवर्ड, आरजीपी, तृणमूल काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्‍यात या निवडणुकीत भाजपने मगोपसोबत आणि काँग्रेसने गोवा फॉरवर्डसोबत युती केली असून, आप, आरजीपी आणि इतर पक्ष स्‍वतंत्ररित्‍या निवडणूक लढवत आहेत. या पक्षांच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांनी उमेदवारांच्‍या प्रचारासाठी कंबर कसली आहे.

गत जिल्‍हा पंचायत निवडणुकीत भाजपने दोन्‍हीही मतदारसंघांत स्‍पष्‍ट बहुमत मिळवले होते. यावेळी दोन्‍ही मतदारसंघ काबीज करण्‍याचे प्रयत्‍न भाजपने सुरू केले आहेत. त्‍यामुळे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍यासह भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक, मंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी विविध मतदारसंघांतील भाजप उमेदवारांच्‍या जाहीर प्रचारात सहभाग घेण्‍यास सुरुवात केली आहे. ‘आप’ने ही निवडणूक प्रतिष्‍ठेची बनवत दिल्लीचे माजी मुख्‍यमंत्री तथा ‘आप’चे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना मैदानात उतरवून घरोघरी प्रचार आणि कोपरा बैठकांवर भर दिला आहे.

गोवा फॉरवर्डकडून पक्षाचे अध्‍यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई, सरचिटणीस (संघटन) दुर्गादास कामत यांनी काही महिन्‍यांपूर्वीच निश्‍चित केलेल्‍या मतदारसंघांतील उमेदवारांचा प्रचार सुरू केला होता. आता या दोन्‍ही नेत्‍यांनी स्‍वत:ला प्रचारात झोकून दिले आहे. त्‍याचप्रमाणे आरजीपी, तृणमूल काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसकडूनही (शरद पवार गट) उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे.

दरम्‍यान, १८ डिसेंबरच्‍या सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचाराची मुदत असल्‍यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्‍याचे प्रयत्‍न सर्वच पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सुरू केले आहेत.

निंबाळकर, माणिकराव आजपासून करणार प्रचार

काँग्रेसच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी उमेदवारांचा प्रचार सुरू केला असून, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सोमवारी गोव्‍यात दाखल होणार आहेत. त्‍यानंतरचे दोन दिवस ते विविध मतदारसंघांत प्रचार करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT