पणजी (प्रतिनिधी): पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गोवा काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रदेशध्यक्ष अमित पाटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते, त्यानुसार ५० मतदारसंघांतून इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत.
काँग्रेस भवनात स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीविषयी प्राथमिक चर्चा झाली. या बैठकीत भाजपच्या विरोधात कशा पद्धतीने लढायचे आणि उमेदवार निवडून आणण्यासाठीच्या रणनीतीवर विचारमंथन करण्यात आले.
उमेदवार निश्चिती: पाटकर यांनी सांगितले की, ज्यांच्याकडून अर्ज आले आहेत, त्या अर्जांवर बारकाईने काम सुरू आहे. 'कोणाची किती ताकद आहे, कोणता उमेदवार जिंकून येऊ शकतो,' अशा सर्व बाबी पडताळून पाहण्यात आल्या आहेत. आरक्षणाची अधिसूचना निघालेली असल्याने, लवकरच प्रदेश निवडणूक समिती उमेदवार ठरवेल आणि त्यांचे नाव जाहीर होईल.
युतीची चर्चा: निवडणुकीसाठी इतर कोणत्या पक्षांशी आघाडी करायची, यावर उद्या, शुक्रवारच्या (१४ नोव्हेंबर) बैठकीत निर्णय होणार आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आवश्यक असलेले निर्णय आणि इतर पक्षांचे या निवडणुकीबाबतचे विचार यावरही उद्याच्या उप-स्तरीय समितीत चर्चा केली जाईल.
अमित पाटकर यांनी यावेळी फोंडा पोटनिवडणुकीबद्दलही पक्षाची तयारी स्पष्ट केली.
फोंड्यात काम सुरू: पाटकर म्हणाले, फोंड्यातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार देणार आहे. फोंड्यात काँग्रेसचे कार्यकर्ते काम करत आहेत आणि पक्ष लढत देण्यासाठी मजबूत आहे.
मतदार पुनरावलोकन: सध्या राज्यात मतदार यादी पुनरावलोकनाचे काम सुरू असल्याने, काँग्रेसचे कार्यकर्तेही मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.
काँग्रेस पक्षाने राज्यातील विधानसभेच्या ४० मतदारसंघांमध्येही काम सुरू केले असून, आगामी जिल्हा पंचायत आणि पोटनिवडणुकांमध्ये भाजपला आव्हान देण्याची तयारी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.