Goa ZP Election: तोरसेत भाजपमध्ये गटबाजी, विरोधकांनी आखली रणनीती; सर्वपक्षीय उमेदवार ठरविण्‍यासाठी रविवारी खास बैठक

Goa Politics News: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी तोरसे मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढत चालली आहे.
Goa ZP Election
Goa ZP ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी तोरसे मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढत चालली आहे. सत्ताधारी भाजपमध्ये उमेदवारांची चढाओढ निर्माण झाल्याने विरोधी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन रणनीती आखण्याचे ठरवले आहे. त्‍यासाठी त्‍यांनी रविवारी १६ नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.

सत्तेचे महत्त्व लक्षात आल्याने अनेक कार्यकर्ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. त्‍यांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे सर्वजण पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांचे खंदे समर्थक मानले जातात. मात्र उमेदवारीसाठी सुरू असलेल्या चढाओढीमुळे भाजपमध्ये असंतोषाची लाट निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Goa ZP Election
Goa Cabinet Decision: मुख्य अभियंत्यासाठी वयाची अट शिथिल, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग, ईपीएफ परतावा, वाचा गोवा कॅबिनेटचे तीन मोठे निर्णय?

काही इच्छुक कार्यकर्त्यांचा दावा आहे की, पक्षातील गटबाजीमुळे अधिकृत उमेदवार ठरविणे कठीण जाणार आहे. त्‍याचा फटका निवडणुकीत पक्षाला बसू शकतो. त्‍यामुळे श्रेष्‍ठींनी इच्‍छुक सर्वांना विचारात घेऊन, त्‍यांच्‍याशी चर्चा करून याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी करण्‍यात येत आहे.

हीच संधी साधून भाजपविरोधी पक्ष काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, ‘आरजी’ आदी विचारी गटांनी एकत्र येऊन एकच सर्वपक्षीय उमेदवार उभा करण्याचा विचार सुरू केला आहे. या हेतूने आयोजित बैठकीत तोरसे जिल्हा पंचायत मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Goa ZP Election
Goa Politics: गोव्यात 'व्यापम'पेक्षा मोठा घोटाळा! 'त्या' मंत्र्याला त्वरित हाकलून लावा; काँग्रेस मागणीवर ठाम

आयोजकांच्या माहितीनुसार, ही बैठक कोणत्याही एकट्या पक्षाच्या नेतृत्वाखाली नाही तर सर्वसंमतीने निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आली आहे.

बैठक कासारवर्णेतील पूर्वा भागात पार पडणार असून, त्यातून तोरसे मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्‍यामुळे तोरसे आणि परिसरातील नागरिकांनी या बैठकीला मोठ्या संख्‍येने उपस्‍थिती लावावी, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com