Impact On Oil Supply: कच्च्या तेलासाठी भारत सध्या दुहेरी कात्रीत! चीन, जपानलाही बसणार फटका; दर भडकण्याची शक्यता

Iran Israel USA War Impact: सध्या भारताकडे सुमारे ४० ते ४५ दिवस पुरेल इतकाच कच्च्या तेलाचा साठा असल्याची माहिती कमोडिटी बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या ‘केपलर’ या संस्थेकडून देण्यात आली आहे.
Impact on India oil supply
Impact on India oil supplyDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: इराणने ‘होर्मुझ’ची सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदी करणाऱ्या भारताला याचा आगामी काळात तडाखा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या भारताकडे सुमारे ४० ते ४५ दिवस पुरेल इतकाच कच्च्या तेलाचा साठा असल्याची माहिती कमोडिटी बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या  ‘केपलर’ या संस्थेकडून देण्यात आली आहे.

भारताकडे शंभर दशलक्ष बॅरल इतका कच्च्या तेलाचा साठा असून यात स्टोअरेज टॅंक, भूमिगत साठे आणि जहाजांवर असलेल्या तेलाचा समावेश आहे. हा साठा सुमारे ४० ते ४५ दिवस वापरता येऊ शकतो.

जागतिक इंधन पुरवठ्याचा विचार केला तर २५ टक्के इंधनाची वाहतूक ‘होर्मुझ’च्या सामुद्रधुनीतून होते. भारतच नव्हे चीन, जपानसह इतर देशांचे इंधन आयातीचे गणित गडबडू शकते. भारताकडून ८८ टक्के कच्च्या तेलाची आयात विदेशातून केली जाते. यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त कच्च्या तेलाचा पुरवठा आखाती देशांमधून तोही ‘होर्मुझ’च्या सामुद्रधुनीतून होतो.

Impact on India oil supply
Iran-Israel war impact on India: इराण-इस्रायल तणावामुळे भारतात महागाईचा 'बॉम्ब' फुटणार? पेट्रोल-डीजलसह 'या' वस्तूंच्या किमती भडकणार

वाहतूक खर्च वाढणार

आखाती देशांमधील कच्चे तेल, नैसर्गिक वायूचा पुरवठा पुढील काही दिवस पूर्णपणे थांबला तर इंधनाचे दर भडकू शकतात. भारतालाही याचा मोठा फटका बसू शकतो, असे  कमोडिटी क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंधन पुरवठ्याची साखळी बाधित झाली तर जहाजांद्वारे होणाऱ्या वाहतूक खर्चात भरमसाट वाढू होऊ शकते. मागील काही महिन्यांपासून रशियाहून होणारी कच्च्या तेलाची आयात भारताने कमी केली आहे.

दुसरीकडे अमेरिका अथवा इतर देशांतून होणारी आयातही भारताला महाग पडते. त्यामुळे भारत सध्या दुहेरी कात्रीत सापडल्याचे मानले जाते. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन भरलेले जहाज बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला तर त्याला आग लावली जाईल, असा इशारा इराणने दिला आहे.

Impact on India oil supply
Pakistan Afghanistan War: पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर 'एअरस्ट्राईक'; 72 तालिबानी ठार, 120 हून अधिक जण जखमी Watch Video

विमानाच्या इंधनसाठ्यावर नजर

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर देखरेख ठेवणाऱ्या ऑपरेटरकडून त्यांच्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या इंधनसाठ्याबाबत माहिती मागविली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष आणखी पेटल्यास पुढील सात दिवसांमध्ये अधिकच्या इंधनाची गरज भासू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयानेच याबाबतचे निर्देश दिले होते. रोज सरासरी नेमका किती इंधनाचा वापर होतो, पुढील सात दिवसांमध्ये नेमके किती इंधन लागू शकेल, याचा अंदाज घेतला जात आहे. देशामध्ये ३३ आंतरराष्ट्रीय विमानतळे असून त्यात दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद आणि चेन्नई येथील विमानतळांचा समावेश होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com