Calangute Fire Incident: "साखरझोपेत असतानाच काळ आला, पण नशिबानं वाचवलं", कळंगुटमध्ये पर्यटकांचे कॉटेज जळून खाक; म्ह्रैसूरचे दोघे थोडक्यात बचावले

Calangute Cottages Gutted in Fire: कळंगुट समुद्रकिनाऱ्याजवळील तिवाई वाडो (Tivai Vaddo) परिसरात पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत पर्यटकांचे दोन कॉटेज पूर्णपणे जळून खाक झाले.
Calangute Cottages Gutted in Fire
Calangute Fire IncidentDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: गोव्यातील प्रसिद्ध कळंगुट समुद्रकिनाऱ्याजवळील तिवाई वाडो (Tivai Vaddo) परिसरात पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत पर्यटकांचे दोन कॉटेज पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासणीत घटनास्थळी पेट्रोलचे अंश सापडल्याने हा प्रकार अपघाती नसून जाणीवपूर्वक घडवून आणलेला घातपात असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग (Fire) इतकी भीषण होती की काही वेळातच दोन्ही कॉटेज आगीच्या भक्ष्यस्थानी आले. सुदैवाने, या कॉटेजमध्ये मुक्कासाला असलेले म्हैसूरचे दोन पर्यटक वेळेत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच पिळर्ण आणि म्हापसा येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे या दोन कॉटेजच्या शेजारी असलेल्या इतर वस्तू वाचवण्यात यश आले, अन्यथा आगीचा मोठा भडका उडून मोठी जीवित व वित्तहानी झाली असती.

Calangute Cottages Gutted in Fire
Calangute: तीन दिवसांत 'एनओसी' सादर करा; अन्यथा आस्थापने बंद, कळंगुट पंचायत 'ॲक्शन मोडवर': 21 रेस्टॉरंट्सना कारणे दाखवा नोटीस

या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत कॉटेजच्या प्रवेशद्वाराजवळ पेट्रोलचे अंश आढळून आले आहेत. यामुळे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली नसून कोणीतरी जाणीवपूर्वक पेट्रोल ओतून आग लावली असावी, असा संशय बळावला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी सुरु केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हा प्रकार जुन्या वादातून झाला आहे की इतर काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. भर पर्यटनाच्या हंगामात अशा प्रकारच्या घटनेमुळे कळंगुटमधील (Calangute) व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com