Yuri alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao : ‘स्टेंडी’मुळे सरकारचा नाकर्तेपणा उघड : युरी आलेमाव

मोपा विमानतळावरील ‘त्या’ फलकाबाबत चौकशीची मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोपा विमानतळाच्या प्रसाधनगृहाचे निर्देश दाखविणाऱ्या स्टेंडीवर बॉम जिजस बासिलिकाचे चित्र असणे यावरून गोव्याच्या संस्कृतीकडे पाहण्याचा सरकारचा नाकर्तेपणा दिसून येतोच त्याहीपेक्षा अशी कंत्राटे देताना सरकार कसे बेजबाबदार वागते हेही दिसून येते, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

ज्या बासिलिकामध्ये पवित्र अशा सेंट फ्रान्सिस झेवियरचे अवशेष ठेवले आहेत त्याचे चित्र या प्रसाधनगृहाच्या स्टेंडीवर असणे हे गोवा आणि गोव्याबाहेरील तमाम भाविकांचा अपमान असून सरकारने त्यासाठी माफी मागण्याची गरज आहे, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जी-20 परिषदेच्या प्रतिनिधींसाठी लावलेल्या फ्लेक्सचा (फलक) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बॉम जिजस बासिलिका चर्चचे चित्र वापरून ‘वॉशरूम’ असा उल्लेख केला आहे.

हळदोणाचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी या प्रकरणामध्ये पोलिस तपासाची मागणी करीत, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

फेरेरा म्हणाले की, यासंदर्भात मी मोपा विमानतळाच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. संशयितांवर २९५ (अ), ५०४, ५०५ (२) व ३४ भादंसंअंतर्गत गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे.

पोलिसांकडे मागणी केली आहे की त्या ठिकाणी बोर्ड कोणी लावला. तसेच कुठल्या वाहनातून तो बोर्ड आणला आणि या कृत्यामागील सूत्रधार कोण, हे शोधण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ९१ अंतर्गत सीसीटीव्ही फुटेज मिळवावेत.

अशा जाहिराती करण्यासाठी कंत्राट देताना त्या जाहिरात एजन्सीची योग्य ती पार्श्वभूमी न तपासता अशी कंत्राटे दिली जातात, त्यामुळे असे प्रकार घडतात. हा असा पहिलाच प्रकार नव्हे तर यापूर्वीही असे प्रकार झाले आहेत; पण त्यातून सरकारने काहीच बोध घेतलेला नाही.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

हा बोर्ड अत्यंत दुर्दैवी आहे. तसेच शिष्टाचाराच्या विरोधात आहे आणि यातून धार्मिक फूट निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. मला फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर याबाबत अनेक संदेश येताहेत. तसेच सोशल मीडियावर अनेक तक्रारीसह पोस्टमध्ये टॅग केले जात आहे.

- अ‍ॅड. कार्लुस फेरेरा, हळदोणा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT