Panaji Air Quality: पणजी, म्हापसा, वास्को, बायणा येथील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा; GSPCB चा अहवाल

गतवर्षी मडगाव, कुंकळ्ळीमधील हवा स्वच्छ, आरोग्यदायी नव्हती
Panaji Smart City
Panaji Smart CityDainik Gomantak
Published on
Updated on

Air Quality In Goan Cities Improving: पणजी, म्हापसा, वास्को आणि बायना येथे हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सन 2021 या वर्षाच्या तुलनेत 2022 मध्ये या शहरांतील हवेत सुधारणा झाली आहे.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (GSPCB) ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

या अहवालात हवेच्या गुणवत्तेतील सुधारणेच्या माहितीसह तातडीच्या उपाययोजना देखील सुचविल्या आहेत.

वायू प्रदूषण नियंत्रण उपायांची अंमलबजावणी, रस्ते बांधणीच्या कामात झालेली घट आणि वायू प्रदूषणाबाबत जनजागृती ही या शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्याची काही कारणे आहेत.

Panaji Smart City
Mumbai-Goa Travel: मुंबई-गोवा प्रवास होणार अधिक वेगवान; दोन तास वेळ वाचणार...

2021 मध्ये पणजीत 'मध्यम' गुणवत्तेच्या हवेचे एकूण 21 दिवस होते ती संख्या 2022 मध्ये 7 झाली. तर 'चांगल्या' हवेच्या गुणवत्तेचे दिवस 2021 मध्ये 32 होते ते 2022 मध्ये 45 झाले.

म्हापशात 2022 मध्ये 66 दिवस 'चांगली' हवा होती आणि केवळ पाच दिवस 'मध्यम' गुणवत्तेची हवा होती. 2021 मध्ये म्हापशात चांगल्या गुणवत्तेची हवा 46 आणि मध्यम गुणवत्तेची हवा 3 दिवस होती.

दरम्यान, वास्को आणि बायना येथे 2021 मध्ये 'खराब' आणि 'अत्यंत खराब' गुणवत्तेच्या हवेचे ६ दिवस होते. येथे 'चांगल्या' हवेच्या दिवसांची संख्या 2021 मध्ये 44 होती ती 2022 मध्ये 54 पर्यंत वाढली, तर 'मध्यम' हवेच्या गुणवत्तेचे दिवस 12 वरून 7 झाले.

याउलट मडगाव, कुंकळ्ळी, सांगे, उसगाव, डिचोली, कुंडई आणि फोंडा या शहरांमध्ये 2022 मध्ये २०२१ च्या तुलनेत 'चांगल्या' हवेच्या गुणवत्तेच्या दिवसांची वारंवारता कमी झाली. त्यामुळे येथे आरोग्यासाठी धोकादायक हवा होती. त्याचा तोटा मुले आणि वृद्ध लोकांना झाला.

2021 मध्ये मडगावमध्ये 18 दिवस चांगली हवा होती तर 2022 मध्ये फक्त दोन दिवस 'चांगली' हवा होती. तर 'समाधानकारक' हवेच्या गुणवत्तेच्या दिवसांची संख्या 2021 मध्ये 87 होती ती 2022 मध्ये 93 वर गेली.

Panaji Smart City
Olive Ridley Sea Turtle गोवन बीचच्या प्रेमात! आता दिवसाही वाढली ये-जा...

पार्टिक्युलेट मॅटर (PM2.5 आणि PM10), नायट्रोजन डायऑक्साइड (NO2), आणि सल्फर डायऑक्साइड (SO2) या प्रदुषकांवरून हवेतील प्रदुषण मोजले जाते. त्यावरून हवेची चांगली ते खूप खराब अशी वर्गवारी केली जाते.

हवेची 'समाधानकारक' श्रेणी संवेदनशील लोकांसाठी मध्यम पातळीवरील चिंता व्यक्त करते. 'चांगली' श्रेणी कोणतेही नकारात्मक परिणाम दर्शवत नाही. 'मध्यम' गुणवत्ता म्हणजे हवा खराब आहे. पुअर आणि व्हेरी पुअर श्रेणी म्हणजे हवा अत्यंत खराब आणि आरोग्यावर तिचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

या अहवालात म्हटले आहे की, डिचोली, कुंकळी, फोंडा, कुंडई, उसगाव आणि सांगे या सहा निरीक्षण स्थानांवर 2022 मध्ये हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढल्यामुळे चांगल्या दिवसांची संख्या शुन्यावर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com