Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

Mhadei Water Dispute: कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

Yuri Alemao Criticised Goa Government: म्हादईच्या रक्षणासाठी कर्नाटकविरोधात लढण्यास भाजपचे नेते आणि भाजप सरकार असमर्थ ठरले आहे. राज्यातील मंत्री आपली पदे जपण्यासाठी धडपडत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: म्हादईच्या रक्षणासाठी कर्नाटकविरोधात लढण्यास भाजपचे नेते आणि भाजप सरकार असमर्थ ठरले आहे. राज्यातील मंत्री आपली पदे जपण्यासाठी धडपडत आहेत, त्यामुळे शेजारील राज्य पाणी वळविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी शुक्रवारी केली.

कर्नाटक निरावरी निगमने खानापूरमधील नेरसे गावात काम सुरू केल्याचे, या कृत्यांवर बारकाईने लक्ष ठेवणारे नामवंत पर्यावरणवादी अभ्यासक राजेंद्र केरकर यांच्या निदर्शनास आले आहे. मात्र, गोवा सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपचे हे सरकार असंवेदनशील असून, त्यांना कर्नाटकी कारवायांची पर्वा नाही. त्यांनी कर्नाटकला हवे ते करण्याची मोकळीक दिली आहे, असेही आलेमाव म्हणाले.

कर्नाटककडे काम सुरू करण्यासाठी कोणत्याही आवश्‍यक परवानग्या नाहीत. नेरसे येथे त्यांनी सर्वेक्षण पूर्ण केले आहे आणि त्यांच्याकडे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचीही परवानगी नाही, तरीही ते नियमांचे उल्लंघन करत आहेत, आरोप युरी यांनी केला.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवा आणि कर्नाटक यांच्यातील प्रदीर्घ वाद मिटला असून, त्यांना नदी वळवण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे म्हटले होते. हे आता खरे ठरल्यामुळेच राज्यातील भाजप सरकार म्हादईच्या रक्षणासाठी काहीच करत नाही, म्हादईपेक्षा आपले पद वाचवण्याची त्यांना जास्त चिंता आहे, असे आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT