Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2023 : अखंडित वीजपुरवठ्याबाबत सरकार अपयशी : युरी आलेमाव

दुरुस्तीवर १२ हजार कोटी खर्च, ५५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

Yuri Alemao On Goa Electricity Department Issue : अखंडित वीजपुरवठा करण्यात वीज खात्याला अपयश आले असून कोट्यवधी रुपये राज्य सरकारतर्फे वीज खरेदीवर खर्च केले जातात. व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील थकीत वीज बिलाची कोट्यवधी रुपयांची वसुली होत नाही.

१२ हजार कोटी रुपये दुरुस्तीवर खर्च केले जात आहेत. काम करताना ५५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ७ नागरिकांचा व १७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ही एक वीज खात्याची काळी बाजू आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

पावसाळी अधिवेशनाच्या सोमवारी पंधराव्या दिवशी वीज खात्याच्या मागण्या आणि कपात सूचना सत्रात आलेमाव बोलत होते. वीज खात्यासाठी ५.३३ टक्के वाढीव आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

परंतु वीज पुरवठ्याबाबत सिस्टमची गरज आहे, ती सिस्टम येथे दिसत नाही. वेर्णा-कुंडई येथील उपकेंद्राची उभारणी कधी होणार आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात २०१० मध्ये आलेक्स सिक्वेरा वीजमंत्री असताना भूमिगत वीज वाहिनीचा प्रस्ताव मंजूर झाला होता, आता तो वास्तवात आला आहे. कुंकळ्ळी हा शहरी भाग आहे. मतदारसंघातील अनेक पंचायत क्षेत्रातील पथदीप लागत नाहीत.

चांदोर-पारोडा हा भाग तीन-तीन दिवस काळोखात असतो, त्याकडे वीज खात्याने लक्ष दिले पाहिजे. भूमिगत वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम खासगी कंपनीकडून करून घेतले जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपये दिले जातात. त्यामुळे वीज खात्याने स्वतःकडे वीज दुरुस्तीसेवा उभारायला हवी.

वीज खात्याकडे जो लाईन स्टाफ आहे, तो कमी आहे. आवश्यक असणारा स्टाफ भरायला हवा. मीटर रिडरचे काम करणारे कर्मचारी अर्धवेळ काम करतात, त्यांना पूर्णवेळ सेवेत घ्यावे. वीजमंत्र्यांनी औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांकडून ४०० कोटींची बिलाची थकीत रक्कम वेळेत वसूल करणे आवश्यक आहे. नाममात्र थकबाकीसाठी शासन लहान ग्राहकांना त्रास देत आहे.

अक्षय ऊर्जेबाबत रोडमॅप?

२०२० मध्ये, २०२३ पर्यंत १५० मेगावॅट हरित ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट जाहीर केले होते. परंतु वास्तविक पाहता जून २०२३ पर्यंत केवळ ४७.१८ मेगा वॅट सौरऊर्जा निर्माण केली आहे. नवीन आणि अक्षय ऊर्जेबाबत कोणताही रोडमॅप सरकारकडे नसल्याची टीका आलेमाव यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला जोरदार धडक, 4 मुलांसह 6 जण गंभीर जखमी

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

SCROLL FOR NEXT